गोकुळ हिंगणकर
तालुका प्रतिनिधी तेल्हारा
तेल्हारा : शहरात गेल्या अनेक वर्षांपासून तेल्हारा शहर हे गुण्यागोविंदाने सर्व जातीय उत्सव साजरे करणारे शहर आहे. इतक्या वर्षाच्या कालखंडात कुठेही मोठा किंवा छोटा अनुचित प्रकार घडवून आलेला नाही. त्यामुळे शहराचे नाव कोणत्याही घटने पासून अबाधित ठेवणे हे गावकरी यांचे पाहिले कर्तव्य आहे. तोच प्रकार तेल्हारा शहरांत दरवर्षीप्रमाणे दिसून आला प्रत्येक सण उत्सव हे सर्वधर्मीय समाज साजरा करतो त्यामुळे दरवर्षी प्रमाणे या वर्षी तेल्हारा शहरात विविध मंडळांनी आपल्या लाडक्या बाप्पाला वेगळ्या पद्धतीने भावपूर्ण निरोप दिला.
यात जुन्या शहरातील शिवाजी, तानाजी, संभाजी , जयबजरंग ,लोकमान्य , प्रताप ,शिव, नवीन शहरात जय हो मंडळ सह आदी मंडळांनी वाजत गाजत मिरवणुका ढोल ताशेच्या गजरात काढत सामाजिक एकतेचा संदेश दिला तर विविध मंडळात वेग वेगळे देखावे, दाखवीत हिंदू मुस्लिम एकता संदेश दिला. यावेळी शहरातील शिवाजी मंडळ यांनी आपले लेझीम पथका द्यारे उत्कृष्ट सादरीकरण केले तसेच गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर… या चा जयघोष देत मिरवणूका निघाल्या यावेळी बजरंग मंडळाने हिंदू मुस्लिम एकतेचे दर्शन देत गणपती उत्सव हा दोन्ही समाज आनंदाने साजरा करतो आहे असे देखाव्या सह हिंदू मुस्लिम युवकांना ट्रॅक्टरवर बसून गळा भेट घेत गणपती उत्सव साजरा करतानाचे प्रात्यक्षिक दाखविले त्यामुळे ते त्या मिरवणुकित सर्वांचे लक्षवेधले होते,तसेच विविध मंडळांनी भारतीय स्वातंत्र्य सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या ७५ वर्षीय निमित्ताने देशभक्ती पर गीतांचा जोश सुद्धा मिरवणुकीत पाहायला मिळाला सर्व मंडळे हे देशभक्ती गीतावर बेधुंद होऊन नाचत होती त्यामुळे शहरांत देशभक्ती चे वातावरण निर्मिती मंडळांनी केली.
यावेळी तेल्हारा शहर तसेच तालुक्यातील कोणत्याही गावात अनुचित प्रकार घटनेची नोंद झाली नाही त्यामुळे तेल्हारा शहर तालुका पुन्हा एकदा “हम सब साथ साथ है” ची परिस्थिती दिसली या सर्व मिरवणुकीत ठाणेदार ज्ञानोबा फड यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त होता तर यावेळी नगर परिषद मुख्याधिकारी राजेश गुरव,याचे मार्गदर्शनाखाली सर्व अधिकारी कर्मचारी,महावितरणचे अभियंता आकाश गुप्ता याचे सर्व अधिकारी कर्मचारी तर या सर्व परिस्थिती वर तालुका दंडाधिकारी तहसीलदार डॉ संतोष येवलीकर यांचे अधिकारी कर्मचारी नियुक्त केले होते. सर्व मंडळांनी मिरवणुका शांतपणे पार पाडल्या बद्दल प्रशासनाच्या वतीने व विविध सामाजिक संघटनेच्या वतीने कौतुक करण्यात आले.