सुमित सोनोने
तालुका प्रतिनिधी, मुर्तिजापूर
मूर्तिजापूर : येथील माजी नगराध्यक्ष द्वारकाप्रसाद दुबे यांच्या पुढाकारातून राष्ट्रीय महामार्गालगतच्या खदान हिंदू स्मशानभूमीत वाहनतळाची व्यवस्था करण्यात आली.या स्मशानभूमीत अंत्यविधीला आलेले नागरिक आपले वाहन राष्ट्रीय महामार्गावरून पोळा चौकात जाणाऱ्या रस्त्यावर उभी करत असत त्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत असे ही बाब माजी नगराध्यक्ष द्वारका प्रसाद दुबे यांच्या लक्षात येताच रस्त्याच्या कडेला मोकळ्या जागेत मुरूम व माती टाकून हा भाग जेसीपीच्या सहाय्याने समतोल करुन वाहन तळाची व्यवस्था करण्यात आली.माजी नगराध्यक्ष द्वारकाप्रसाद दुबेंसमवेत अमोल प्रजापती, देविदास गोळे, शिरभाते, नंदु कनोजे, गजानन दुरतकर, गुलाब दुबे,शालिकराम यादव ,शिवदास तिरकर,नंदू उघडे,किशोर उटाळे,प्रकाश पाटील यांचा या कार्यात मोलाचा वाटा आहे.