लक्ष्मण पवार
तालुका प्रतिनिधी सुरगाणा
नाशिक : आदिवासींच्या न्याय, हक्काच्या लढाईसाठी आदिवासींच्या विविध संस्था, संघटनेचे हजारो कार्यकर्ते छत्तीसगढची राजधानी रायपूरच्या दिशेने ट्रॅव्हल्स,ट्रेन, विमानाने रवाना झाले आहेत.
आदिवासी समन्वय मंच भारत व भारतातील आदिवासी समुदाय आयोजित १६ वे “१३ सप्टेंबर जागतिक आदिवासी अधिकार” दिवसानिमित्त राष्ट्रीय संमेलन छत्तीसगडची राजधानी रायपूर येथील पंडीत दीनदयाळ ऑडोटोरीयम,सभागृह येथे येत्या १२ व १३ सप्टेंबर रोजी होत आहे. या संमेलनासाठी प्रमुख अतिथी म्हणून महामहिम सुश्री अनुसुईया उईके राज्यपाल छत्तीसगड या उपस्थित राहणार आहेत.तसेच गुजरातचे अशोकभाई चौधरी,डॉ.शांतिकर वसावा,दिल्लीचे निकोलस बारला , मध्यप्रदेशचे पोरलाल खरते ,विक्रम, राजस्थानचे नक्ताराम भील, आसाम चे स्टेनली इंगती,अरविंद नेताम, महाराष्ट्र नाशिकचे प्रा.अशोक बागुल,डॉ . सुनिल पऱ्हाड आदी आमंत्रित लोकप्रतिनिधी उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. यापूर्वी २०१६ देशाची राजधानी (दिल्ली),२०१७ महाराष्ट्र (नागपूर),२०१८ मध्ये झारखंड (रांची),२०१९ कर्नाटक (म्हैसूर) २०२० गुजरात (भिलोडा),२०२१ आसाम (दीपू ) येथे घेण्यात आले.तर यावर्षाचे राष्ट्रीय संमेलन रायपुर येथे होत आहे.या संमेलनात १२ सप्टेंबर रोजी विविध विषयांवर चर्चा करण्यात येणार आहे. यामध्ये विकासाच्या आधुनिक संकल्पनेत आदिवासी आणि नैसर्गिक संसाधनांचे संवर्धन,पारंपारिक ज्ञानाचे संरक्षण आणि प्रसारामध्ये आदिवासी महिलांची भूमिका, आदिवासींचे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय हक्क आणि वास्तविक स्थिती,आदिवासींचे पारंपारिक ज्ञान आणि चालीरीतीं मधील वैज्ञानिक ज्ञान,आदिवासी बोली भाषा साहित्य आणि इतिहास,पेसा कायदा आणि ज्या राज्यात लागू करण्यात आलेला आहे .तेथील अंमलबजावणी स्थिती,वन अधिकार कायदा आणि अंमलबजावणी,राष्ट्रीय आदिवासी धोरणाची सद्यस्थिती, भूसंपादन कायदा आदिवासींचे विस्थापन सध्याच्या स्थिती, डिलिस्टिंगवर चर्चा,काही प्रदेशांमध्ये आदिवासींच्या मूळ यादीत समावेश केलेला नाही. यावर सविस्तर चर्चा, भारत सरकार आणि भारताचे सर्वोच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालय पदोन्नतीमध्ये १००% आरक्षण आणि अनुसूचित क्षेत्रात तृतीय,चतुर्थ श्रेणी कर्मचारी भरती दृष्टीकोन,आदिवासी महिलांना संपत्तीचे समान अधिकार मिळणे,अनुसूचित जाती, जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा व सध्यस्थितीवर चर्चा,राष्ट्रीय जनगणनेत पूर्वीप्रमाणेच आदिवासींसाठी स्वतंत्र स्तंभावर चर्चा,देशातील आदिवासींवरील होणारे अन्याय अत्याचार, छत्तीसगढ राज्य व इतर क्षेत्रातील आदिवासी भागातील नक्षल समस्येवर चर्चा.या विषयांबरोबरच आदिवासींच्या आंतरराष्ट्रीय,राष्ट्रीय,प्रादेशिक समस्यांवरही चर्चा केली जाणार आहे.
तसेच १२ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५:३० वाजता विविध राज्यांतून आलेल्या सांस्कृतिक गटांचे सादरीकरण होणार आहे. यामध्ये विविध राज्यातील सांस्कृति,आदीम लोकपरंपरा, रुढी परंपरा,चालीरीती यांची देवाण घेवाण,आदान प्रदान, लोकनृत्य,वाद्ये यांचे मंचावर सादरीकरण करण्यात येणार आहेत.त्यामुळे विविध प्रांतातील कला एकाच मंचावर पहावयास मिळणार आहेत.
१३ सप्टेंबर रोजी पारंपारिक आदिवासी वेशभूषेत रॅली व त्यानंतर सार्वजनिक सभेत रूपांतर होऊन विविध राज्यांच्या समस्यावर सामूहिक चर्चा करण्यात येणार असल्याचे नियोजन करण्यात आलेले आहे. या राष्ट्रीय संमेलनसाठी महाराष्ट्रातून हजारो बांधव ८ सप्टेंबर पासून रायपूरकडे रवाना होणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधी प्रा. अशोक बागुल उत्तर महाराष्ट्र,डॉ. सुनिल पऱ्हाड पश्चिम महाराष्ट्र, हिरालाल भोई पूर्व महाराष्ट्र, प्रा.मधुकर उईके मध्य महाराष्ट्र यांनी कळवले आहे. राष्ट्रीय स्तरावरून कर यात प्रामुख्याने महाराष्ट्र राज्य आदिवासी बचाव अभियान, आदिवासी एकता परिषद, महाराष्ट्र राज्य आदिवासी प्राथमिक शिक्षक संघटना, विविध आदिवासी सामाजिक संघटना, स्वयंसेवी संस्थेचे प्रतिनिधी सहभागी झाले.
असल्याची माहिती महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधी प्रा. अशोक बागुल उत्तर महाराष्ट्र, डॉ. सुनिल पऱ्हाड पश्चिम महाराष्ट्र, हिरालाल भोई पूर्व महाराष्ट्र, प्रा.मधुकर उईके मध्य महाराष्ट्र यांनी कळवले आहे. संयुक्त राष्ट्र संघटनेच्या महासभेने १३ सप्टेंबर २००७ रोजी आदिवासींच्या संरक्षणासाठी ४६ कलमी अधिकार घोषणापत्र जाहीर केलेले आले. या घोषणापत्रात आदिवासींचे अस्तित्व, हक्क, अधिकार, मानवतावादी मूल्ये, जीवनमूल्ये आणि विकासातील सातत्य बघता आदिवासींचे अधिकार काय आहेत,भारतीय संविधानात कोणते विशेष अधिकार बहाल केलेले आहेत यावर विचारमंथन व सामुदाईक ठराव संमत करून शासनास सादर करण्यात येणार आहे.
या अधिकार दिवसाला सर्व आदिवासी बांधवांनी उपस्थित रहावे असे आवाहन राष्ट्रीय स्तरावरून करण्यात आलेले आहे. या संमेलनासाठी नंदुरबार, धुळे,जळगांव, ठाणे, पालघर, नाशिक ,पुणे, नागपूर, गोंदिया, गडचिरोली येथून हजारो कार्यकर्ते रायपूरकडे येत्या ९ ते १० सप्टेंबर दरम्यान रेल्वेने रवाना होत आहेत. यात प्रामुख्याने किसन ठाकरे, रावण चौरे, के.के.गांगुर्डे ,राजेंद्र वाघले, जयवंत गारे, विजय पवार, रतन चौधरी, सुभाष गवळी, चेतन खंबाईत, आनंदराव भोये, विजय घुटे,इंजिनिअर गणेश भोये, प्रा.प्रदीप इम्पाळ,गुलाब आहेर, सुशिल कुवर, विजय घुटे, काशिनाथ बागुल,पद्माकर बागुल, देवेंद्र ढुमसे,सुरगाणा रतन चौधरी,शंकर बागुल, उत्तम वाघमारे, राजू चौधरी, माधव चौधरी,विलास राठोड, रुख्मिणी गवळी, सरोजताई भोये, भावना पवार /इलपाची, मंगला चौरे,बेबीताई गांगुर्डे, सरला ठाकरे, सुरेखा ठाकरे, रोहिदास डगळे, शरद जाधव व इतर हजारो प्रमुख कार्यकर्ते यांचा समावेश आहे अशी माहिती किसन ठाकरे यांनी दिलेली आहे.