अतिश वटाणे
ग्रामीण प्रतिनिधी उमरखेड
उमरखेड येथे बिरसा क्रांती दलाच्या वतीने सोमा डोमा उंमरे (आंध) १० डिसेंबर व रॉबिन हूड तंट्या मामा (भिल्ल) ४ डिसेंबर यांच्या स्मृतिदिनानिमित्त आदिवासी संघर्ष परिषदेचे आयोजन दहा डिसेंबर २३ रोजी उमरखेड येथे केले असून या परिषदेचे नियोजन करण्यासंदर्भात नियोजन बैठकीचे आयोजन उमरखेड येथे करण्यात आले होते. यावेळी आदिवासी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होता.उमरखेड कृती समिती अध्यक्ष उत्तम पांडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीमध्ये आदिवासी संघर्ष परिषदेची रूपरेषा यावर चर्चा करण्यात आली आणि या परिषदेसाठी जास्तीत जास्त समाज बांधवांनी सहभाग घ्यावा यासाठी आवाहन करण्यात आले. यावेळी बिरसा क्रांती दलाचे राज्य उपाध्यक्ष डी.बी.अंबुरेसर, नारायनराव पिलवंड (राज्य प्रशिक्षक बीव्हिएफ), बी. के. डी. जिल्हा उपाध्यक्ष पत्रकार निलेश पिलवंड, भागवत काळे (उमरखेड ता.अध्यक्ष बिकेडी), सरपंच पिंपळदरी बंडूजी ढाकरे ता.उपाध्यक्ष उमरखेड,अशोक ढोले,(ता.अध्यक्ष बिरसा एम्मलोईज फोरम)भाऊराव जुडे,मारोती पिलवंड, चंद्रकांत खंदारे,बाळू खुपसे, महिला फोरमच्या ता.अध्यक्ष शारदाताई वानोळे,हरणाबाई पेजेवाड,शांताताई अंबुरे, पुष्पाताई हातमोडे,विमलबाई लांडगेवाड , तसेच संजय अंभोरे,सामाजिक कार्यकर्ते मारोतराव कराळे, सुभाष टाले, प्रताप तारमेकवाड,गजानन गुहाडे, प्रवीण भुसारे, बादल पिटलेवाड, शिवाजी पेजेवाड, राजेश गायकवाड, गजानन मेंडके, बाळासाहेब व्यवहारे, विजय भुसारे,, विठ्ठल ठाकरे उपसरपंच आडद, रवी मेटवाड, अर्जुन असोले, आदी उपस्थित होते.