उल्हास मगरे तालुका प्रतिनिधी, तळोदा
तळोदा:देशातील प्रत्येक वंचिताच्या जीवनात घर,रोजगार आणि आरोग्य देण्यासाठी केंद्र व राज्य सरकार कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन केंद्रीय सूक्ष्म,लघु व मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी आज तळोदा तालुक्यातील करडे येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली निघालेल्या विकसित भारत संकल्प यात्रेचे करडे येथे उद्घाटन प्रसंगी केले. या वेळी बोलताना नामदार नारायण राणे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गरिबांची मान उंचावली जावी यासाठी संकल्प यात्रा सुरू केली आहे. गरिबांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळाला की नाही अन्यथा या योजना कोणत्या यासंदर्भामध्ये आहेत हे सर्वसामान्यांना लक्षात यावे यासाठी विकसित भारत संकल्प यात्रा काढण्यात आलेली आहे. या योजनेचा लाभ सातपुड्यातील तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचला की नाही हे पाहण्यासाठी मी सातपुड्यातील शेवटचे गाव करडे पर्यंत येऊन पोहोचलो आहे शासकीय योजनांचा लाभ गरिबांपर्यंत पोहोचविण्यासाठी अधिकाऱ्यांनी कटिबद्ध रहावे पंतप्रधान नरेंद्र मोदींचा संकल्प आहे की, शासनाच्या विविध योजना या तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचल्या पाहिजे यासाठी लोकप्रतिनिधी बरोबर अधिकाऱ्यांनीही सहकार्य करून काम केले पाहिजे असे आवाहन ना. नारायण राणे यांनी यावेळी केले.बोरद परिसरातील करडे येथे नामदार नारायण राणे यांचे आगमन झाल्यानंतर या ठिकाणी महिलांनी आपल्या आदिवासी पेहरावात त्याचें स्वागत पारंपरिक पद्धतीने करत नाचत, गाजत मंत्री महोदयांना सभा स्थळापर्यंत आणण्यात आले. त्यानंतर आदिवासींचे कुलदैवत माता देव मोगरा यांच्या प्रतिमेचे त्या ठिकाणी पूजन करण्यात आले. यावेळी आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित, नंदुरबार च्या खासदार डॉ. हिना गावित, तळोदा शहादा मतदार संघाचे
निवडणूक प्रभारी कैलास चौधरी, जि.प. सदस्या सुनीता पवार हे व्यासपीठावर उपस्थित होते. नारायण राणे यांनी भरड धान्य प्रदर्शन व आरोग्य शिबीर येथे देखील भेट दिली व उपस्थित रुग्णांची विचारपूस केली. उपमुख्यकार्यकरी अधिकारी जयवंत उगले,अरीरिक्त मुख्यकार्यकारी अधिकारी प्रमोद पवार, उपजिल्हाधिकारी गोगाटे, प्रांताधिकारी मंदार पत्की,तहसीलदार गिरीश वाखारे,गटविकास अधिकारी परशुराम कोकणी,गटशिक्षणाधिकारी शेखर धनगर,ग्रामपंचायत विभागाचे बी.डी. मोहिते, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. महेंद्र चव्हाण,डॉ.अरुण लांडगे,माजी सभापती यशवंत ठाकरे,किसान मोर्चाचे प्रवीण राजपूत, भाजपा तालुका अध्यक्ष गौरव वाणी,ग्रामसेवक, तलाठी, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्यसह परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने हजर होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुकेश कापुरे यांनी केले तर आभार ग्रामसेवक प्रकाश कोळी यांनी मानले.तळोदा पो. नि. राहुल पवार यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.