अयनुद्दीन सोलंकी
तालुका प्रतिनिधी, घाटंजी
घाटंजी, 24 नोव्हेंबर :- घाटंजी तालुक्यातील तलाठी बिरमोल रामकृष्ण तायडे (वय 54) रा. खापरी यांचे कार्यालयात शासकीय काम करत असतांना शासकीय कामात अडथळा निर्माण केल्या प्रकरणी आरोपी पवन पेटेवार (वय 55) रा. आनंद नगर घाटंजी विरुद्ध घाटंजी पोलीस ठाण्यात भादंवि कलम 353, 186, 323, 504 व 506 अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. घाटंजी पोलीस स्टेशनचे ठाणेदार तथा पोलीस निरीक्षक निलेश सुरडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक शशिकांत नागरगोजे हे पुढील तपास करीत आहे.
पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी दुपारी 12.30 वाजता आरोपी पवन पेटेवार याने मी आत्ताच जेल मधून सुटून आलो आहे. मला लवकर 7/12 उतारा काढुन द्या, असे म्हणून जोरजोराने ओरडत होता. फिर्यादी बिरमोल तायडे यांनी आरोपी पवन पेटेवार यांस सांगितले की, ओरडू नको थोडं थांब, असे म्हटले असता, आरोपी पवन पेटेवार याने फिर्यादी बिरमोल तायडे हे शासकीय कामकाज करत असलेल्या टेबलावरील कागदपत्रे फेकुन दिले. तसेच बिरमोल तायडे यांस शिवीगाळ करून गालावर थापडाने मारहाण केली. तुम्ही बाहेर निघा तुम्हाला मारुन टाकतो. तुमचे सोबत तुमचे कार्यालय जाळून टाकतो. तसेच तुम्ही कुठेही दिसला तर तुम्हाला मारुन टाकीन, अशी धमकी दिली. अशा लेखी तक्रारीवरुन घाटंजी पोलीस ठाण्यात आरोपी पवन पेटेवार विरुद्ध शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घाटंजी पोलीस स्टेशनचे पोलीस उप निरीक्षक शशिकांत नागरगोजे हे पुढील तपास करीत आहे.
![](https://i0.wp.com/adhikarnama.in/wp-content/uploads/2021/07/41795f06-911f-4a48-906f-66953021f824.jpg?fit=1080%2C1080&ssl=1)
![](https://i0.wp.com/adhikarnama.in/wp-content/uploads/2021/07/41795f06-911f-4a48-906f-66953021f824.jpg?fit=1080%2C1080&ssl=1)