प्रमोद अहिनवे
तालुका प्रतिनिधी, जुन्नर
महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष सन्माननीय श्री राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार आपली शिरूर लोकसभा,जुन्नर तालुका अध्यक्ष या पदी नेमणूक करण्यात आली आहे .महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे श्री.राजेंद्र (बाबु) वागसकर-नेते महाराष्ट्र राज्य, श्री.अजय शिंदे-सरचिटणीस, महाराष्ट्र राज्य, श्री.मकरंद पाटे -पुणे जिल्हाध्यक्ष याच्या हस्ते श्री.तानाजीशेठ तांबे यांना नियुक्ती पत्रक देण्यात आले.
जुन्नर तालुक्यात विविध प्रश्नांवर,अन्यायविरोधात नेहमी आवाज उठवणारे व्यक्तीमत्व ,सामाजिक काय॔कते॔,अशी ओळख असणारे अध्यक्ष तालुक्याला मिळाल्याने नक्कीच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेस त्या गोष्टीचा फायदा होईन असे जुन्नर तालुक्यातील मनसे सैनिकाचे मत व्यक्त करताना सांगण्यात आले.