संतोष भरणे
ग्रामीण प्रतिनिधी इंदापूर
इंदापूर.शहा सांस्कृतिक भवन इंदापूर शहर येथे.राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा (शरद पवार गट)कार्यकर्ता मेळावा आणि कार्यकर्त्यांना निवडीचे पत्र खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते देण्यात आले.यावेळी सुप्रिया सुळे बोलत होत्या ज्यावेळी पहिल्यांदा मी लोकसभेची निवडणूक लढवली त्यावेळेस शरद पवार यांची कन्या म्हणून लोकांनी माझ्याकडे पाहिले.आणि ही मुलगी पास होईल की नापास होईल अशा चर्चांना उधाण आले परंतु शरद पवार यांच्या विचारांना लोकांनी समोर ठेवून मला मेरिट मध्ये पास केले.आणि मी आणि पवार साहेब आज तुमच्यासमोर छाती ठोकपणे सांगू शकतो की आम्ही कुठल्याही चौकशीला सामोरे जायला तयार आहे.माझी सगळ्यात मोठी ताकत म्हणजे माझी इमानदारी आहे.ना आम्ही कधी कॉन्ट्रॅक्ट घेतले ना आम्ही कधी साखर कारखाना काढला.माझा वैयक्तिक एकही साखर कारखाना नाही.त्यामुळे मी भारतीय जनता पार्टी म्हणजेच भ्रष्टाचार जुमला पार्टीला आणि त्यांच्या ईडी ला घाबरत नाही.सध्याच्या या राजकारणा पायी मी माझ्या मुलीचा वाढदिवस कोर्टात साजरा केला.कारण मला मुलीचा वाढदिवस महत्त्वाचा नसून मला आज महाराष्ट्रातील मायबाप जनता महत्वाची आहे.यशवंतराव चव्हाण यांचा वारसा फक्त कोण पुढे घेऊन चालले असेल तर ते आहेत फक्त शरद पवार आणि माझी लढाई ही वयक्तिक कोणाशीही नाही फक्त भारतीय जनता पार्टीच्या केंद्रातील अदृश्य शक्तींबरोबर आहे.महागाई आणि भ्रष्टाचार या दोन मुद्द्यांवरून भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांवर सुप्रिया सुळे यांनी सडकून टीका केली.भारतीय जनता पार्टीने राष्ट्रवादी काँग्रेसवर भ्रष्टाचाराचे अनेक आरोप केले परंतु जर भारतीय जनता पार्टीने केलेले आरोप खरे असतील तर ते सिद्ध करून दाखवावेत.आणि जर ते खोटे निघाले तर त्यांनी जाहीर हात जोडून माफी मागावी.माजी गृहमत्री अनिल देशमुख,मंत्री छगनराव भुजबळ,नवाब मलिक,हसन मुश्रीफ.यांच्यावर भाजपाने अनेक आरोप केले आणि त्यांना नाहक त्रास दिला परंतुु ते निर्दोष आहेत.असे सुप्रियाताई सुळे म्हणाल्या.आमच्याबरोबर राहिले की भ्रष्टाचारी आणि त्यांच्या बाजूला गेले की ते वॉशिंग मशीन मधून चकाचक कसे होतात. असा त्यांनी घणाघात देवेंद्र फडणवीस यांच्या वरती केला.माझ्या शिक्षणाचा उपयोग या माझ्या मतदारसंघातील मायबाप जनतेला झाला पाहिजे यासाठी मी राजकारणात आले आहे.सध्याच्या भारतीय जनता पार्टीतील 105 आमदारांना विचारा की त्यांचे किती हाल चालले आहेत.त्यांच्या एवढे हाल आज कोणाचेच नाहीत आणि त्यांचे हे हाल फक्त भाजपामुळेच चालू आहेत.त्यांच्यावर सत्तेत असून मुग गिळून बसायची वेळ आली आहे.भारतीय जनता पार्टी हा पक्ष मराठी माणसांच्या पूर्ण विरोधात आहे असा त्यांनी घणाघात केला.राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे चिन्ह आणि नाव जरी चोरले तरी आम्हाला काही फरक पडत नाही असे त्या शेवटी म्हणाल्या.यावेळी कार्यकर्ता मेळावा संपल्यानंतर सुप्रिया सुळे आणि कार्यकर्त्यांनी तहसील कार्यालयावर मोर्चा काढत दूध, सोयाबीन, कापूस, कांदा या पिकांना हमीभाव मिळावा आणि सध्याचे पाडलेले दर वाढवून मिळावेत यासाठी तहसील कार्यालय इंदापूर येथे मोर्चा काढला.तहसीलदार श्रीकांत पाटील यांना निवेदन दिले.सुप्रिया सुळे यांच्यासह जि.प माजी बांधकाम सभापती प्रविण माने,जगन्नाथ शेवाळे,तालुका अध्यक्ष तेजसिंह पाटील,इंदापूर कार्याध्यक्ष महारुद्र पाटील,अशोकराव घोगरे, सागर मिसाळ,भारतीताई शेवाळे, छायाताई पडसळकर,राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते दादासाहेब थोरात त्यांच्यासह अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
चौकट…
हर्षवर्धन पाटील यांची सासरवाडी बारामती असून त्यांचा आणि आमच्या घराण्याचे नातंगोत आहे. दोन्हीही घराण्याचा नात्यांचा मोठा गुंता आहे.त्यामुळे आमचे राजकीय मतभेद आहेत परंतु मनभेद नाहीत.असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.









