परवेज खान
शहर प्रतिनिधी पांढरकवडा
पांढरकवडा:
नेहरू युवा केंद्र संघठन, क्रीडा मंत्रालय भारत सरकार आणि unicef महाराष्ट्र याच्या संयुक्त विद्यमाने 19 आणि 20 नोव्हेंबर रोजी मुंबई येथे राज्यस्तरीय युवा संसद आयोजित करण्यात आली होती. ज्यामध्ये युवा खासदार म्हणून पांढरकवडा गावातील सलमान रफीक खान यांने यवतमाळ जिल्ह्याचे नेतृत्व केले. विरोधी पक्ष पॅनलमध्ये बसून सलमान यांने GDP, 5 trillion economy, परकीय गंतवणूक , गरीब – श्रीमंती दरी, गरिबी, वर्ल्ड रिपोर्ट मध्ये भारताचे घसरते मांनाकन या महत्वाच्या विषयावर अर्थ व वित्त खात्याला प्रश्न विचारून चर्चा केली. राज्य युवा संसद, मुंबई येथे संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यातून निवडून आलेल्या तरुण खासदाराशी देशाच्या व राज्यातील विविध प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. विधानसभा, विधानपरिषद, राज्यपाल भवन ह्या महत्वाच्या ठिकाणी युवा संसदेच्या तरुणांनी भेटी दिल्या. विधान परिषद उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी विधान परिषद भवनात राज्यस्तरीय युवा संसदेच्या युवा खासदारांना मार्गदर्शन केले. सलमान यांने यापूर्वी पण नॅशनल युथ फेस्टिवल, Y-20 इंटरनॅशनल सबमिट, मेरी माती मेरा देश, अश्या विविध ठिकाणी प्रतिनिधित्व केले आहे.