अजिंक्य मेडशीकर
तालुका प्रतिनिधी मालेगांव
कार्तिक पौर्णिमा निमित्त ब्रह्मतीर्थ भौरद येथे श्री भगवान मालिकेश्वर पूजन उत्सव कार्यक्रम विवेकानंद आश्रम शाखा भौरद यांचे कडून २७ नोव्हेंबर सोमवार रोजी व भव्ययात्रा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.दरवर्षीप्रमाणे परमपूज्य सुखदास महाराज द्वारा स्थापित ब्रह्मतीर्थ भौरद येथील आश्रमात कार्तिक पोर्णिमेच्या निमित्ताने आराध्य दैवत श्री भगवान मल्लिकेश्वराच्या पूजन उत्सव कार्यक्रम संपन्न होणार असून 27 नोव्हेंबर रोजी सकाळी ७ वाजता श्री भगवान मल्लिकेश्वर अभिषेक व विधिवत पूजन सकाळी करून त्या नंतर 10 ते 12 वाजता मोफत आरोग्य तपासणी शिबिर व औषधांचे वाटप विवेकानंद आश्रम यांच्याकडून करण्यात देण्यात येणार आहे.दुपारी 1 ते 3 वाजता गुरुदेव भजन मंडळी ब्राह्मणवाडा यांच्यातर्फे भक्ती गीतचा कार्यक्रम राहणार असून,त्या नंतर 2 ते 4 वाजता परमपूज्य सुखदास महाराज श्रींच्या शोभा यात्रेचे आगमन व दर्शन सोहळा व दहीहंडीचा कार्यक्रम ठेवण्यात आला आहे.तसेच सायंकाळी 4 ते 6 वाजता भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असून त्यांनतर गायक आश्रम हिवरा आश्रम यांच्याकडून अनुभूती गायनाचा कार्यक्रम ठेवण्यात आले आहे. रात्री 7 ते 8 वाजता पर्यंत जालना येथील ह भ प गजानन महाराज शास्त्री पवार यांच्याकडून रामायणाचार्य व भागवताचार्यचे प्रवचन करण्यात येणार आहे. तसेचप्राची 8 ते 10 वाजता शाहीर सुरेश तेफाडे रुईखेड यांचा कलापथकाचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आला आहे.परिसरातील व भावी भक्तांनी महाप्रसादाचा व यात्रा महोत्साचा लाभ घ्यावा असे आवाहन ब्रह्मतीर्थ भौरद येथील ग्रामस्थांनी केले आहे.