गजानन डाबेराव
ग्रामीण प्रतिनिधी नांदुरा
नांदुरा;-नांदुरा तालुक्यातून जात असलेला राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर नांदुरा मलकापूर हायवेवर वडनेर भोलजी गावानजीक 24 नोव्हेंबरच्या रात्री साडेबारा वाजता बंद पडलेल्या उभ्या ट्रकवर आयशर ट्रकने जबर धडक दिल्याने भीषण अपघात झाला . सविस्तर माहिती अशी की आयशर कंपनीचा ट्रक क्रमांक एम एच 47 एचडी 63 86 मलकापूर कडून नांदुरा कडे जात असताना महामार्गावर बंद पडलेल्या ट्रक क्रमांक एम पी 04 एच डी 4063 मलकापूर कडून नांदुरा कडे जात होता. दरम्यान आयशर कंपनीच्या ट्रकने उभ्या असलेल्या ट्रकला जबर धडक दिल्याने जागेवर एक ठार व दोन गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती प्राप्त झाली असून घटनेची माहिती मिळतात . आऊट पोस्ट पोलीस स्टेशन वडनेर भोलजी सहाय्यक पोलीस निरीक्षक सहाय्यक पोलीस मंगेश जायले साहेब व ओम साई फाउंडेशन चे नांदुरा तालुका अध्यक्ष विलासभाऊ निंबोळकर तात्काळ घटनास्थळी दाखल झाले व ओम साई फाउंडेशनच्या ॲम्बुलन्सने मृत झालेल्या व्यक्तीस व गंभीर जखमी असलेल्या व्यक्तींना प्राथमिक आरोग्य केंद्र नांदुरा येथे दाखल केले. यावेळी ओम साईं फाउंडेशनचे सेवक कृष्णा नालट आश्विन फेरण आनंद वावगे व पोलीस कर्मचारी संजय निंबो ळकर विक्रम राजपूत पंकज डाबेराव शेजोळे साहेब काकड साहेब जाधव साहेब यांनी मदत कार्य केले. वृत्तलिहैपर्यंत मृत व्यक्तीचे व जखमी झालेल्या व्यक्तींचा नाव पत्ता उपलब्ध होऊ शकला नाही. पुढील तपास आऊट पोस्ट पोलीस स्टेशन वडनेरभोलजी करीत आहे.


