संतोष पोटपिल्लेवार
शहर प्रतिनिधी, घाटंजी
घाटंजी :- वंचित बहुजन आघाडी व सामाजिक, राजकीय संघटनेच्या वतीने शेत मातीत आंदोलन करण्यात येत आहे.गेल्या अनेक वर्षापासून निसर्गाच्या अव कृपेने, राज्यकर्त्यांचा शेतकऱ्यांविषयी दुर्लक्षित धोरणामुळे व महसूल प्रशासनाच्या मुजोर भूमिकेमुळे जिल्ह्यासह तालुक्यातील शेतकरी पूर्णतः हताश झाला आहे. चालू वर्षी खरीप हंगाम पूर्णतः बुडाला असून बँकेचे व खाजगी सावकाराच्या कर्जाच्या तगाद्याने शेतकरी वैतागून गेला आहे. येलो मोझाक मुळे सोयाबीनचा उतारा एकरी दोन क्विंटलच्या आत आला असून कापसाला सुद्धा अल्पबोंडे धरल्याने व कापूस पिकावर बोंड अळीचा प्रादुर्भाव असल्याने उत्पन्नात फार मोठी घट होत आहे. अशी विदारक परिस्थिती शेतकऱ्यांची असताना महसूल प्रशासन,तालुका कृषी विभाग, पिक विमा कंपन्या झोपेचे सोंग घेत आहे. याच अनुषंगाने सरकारला व प्रशासनाला जागे करण्यासाठी वंचित बहुजन आघाडी व सामाजिक,राजकीय संघटनाच्या वतीने घाटंजी तालुक्यातील तिवसाळा येथे ओल्या व कोरड्या दृष्ट चक्रात अडकलेल्या शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी वंचित बहुजन आघाडी तालुका महासचिव नितीन राठोड यांच्या नेतृत्वात दिनांक २७ नोव्हेंबर २०२३ ला शेत मातीत आंदोलन करण्यात येत आहे . यामध्ये घाटंजी तालुका तात्काळ दुष्काळ जाहीर करा, शेतकऱ्यांना सरसकट विमा देण्यात यावा, नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपये सानुग्रह निधी देण्यात यावा, अतिरिक्त विजेचे लोड शेडिंग बंद करून शेतकऱ्यांना ओलिता करीता दिवसा विज देण्यात यावी, पी. एम. किसान योजनेच्या निधीपासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांना तात्काळ त्यांच्या बँक खात्यात रक्कम अदा करण्यात यावी या मागण्याला घेऊन सदर आंदोलन करण्यात येत आहे .आंदोलनात प्रमुख उपस्थिती वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष पांडुरंग निकोडे, तालुका अध्यक्ष संघपाल कांबळे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुका अध्यक्ष मोरेश्वर वातीले, विदर्भ संघटक पी.बी.आय मधुकर निस्ताने, प्रसिद्ध समाजसेवक महेश पवार,सामाजिक कार्यकर्ते पंजाब मेश्राम, ज्येष्ठ समाजसेवक डॉ. खेमचंद पवार, जिल्हा उपाध्यक्ष आम आदमी पार्टी प्रेम चव्हाण, माजी जिल्हा परिषद सदस्य वासुदेव महल्ले, अध्यक्ष युवा आघाडी पी.बी.आय मोहन पवार, सरपंच डांगरगाव प्रकाश खोडे, अध्यक्ष गोर बंजारा सेना गणेश राठोड, निलेश कडू, प्रेमानंद उंबरे, तुकाराम कोरवते, मनोज मुनेश्वर, रा.वी.नगराळे, मंगेश धुर्वे, कपिल चौधरी ,रत्नाकर शेंडे संदीप सुरपाम व परिसरातील सर्वत्र शेतकरी या आंदोलनात उपस्थित राहणार आहे.