विजयकुमार गायकवाड
तालुका प्रतिनिधी इंदापूर
इंदापूर:भिगवण तालुका इंदापूर येथे महाधन ॲग्रोटेक लिमिटेड पुणे यांच्या संयुक्त विद्यमानाने कांदा पीक परिसंवाद आयोजित केला होता.या परिसंवादाला गावातील प्रगतशील शेतकऱ्यांची उपस्थिती होते महाधान कंपनीचे मॅनेजर आप्पासाहेब भिसे यांनी कांदा पिकावरती मोलाच असं मार्गदर्शन दिलं. कांदा पिकाला खत व्यवस्थापनाबद्दल अतिशय चांगली माहिती त्यांनी या ठिकाणी क्रॉपटेक 8:21:21 या खतामुळे. कांदा पिकाला होणारा फायदा कांदा एक समान आकाराचा होतो चिगळी कांदा कमी प्रमाणात निघतो. कांदा साठवणुकीत ठेवल्यानंतर दोन महिने कांदा जास्त काळ साठवणुकीमध्ये टिकला जातो कोणत्याही प्रकारची काजळी येत नाही व कांद्याची सड होत नाही. कमी खर्चामध्ये कांद्याचे उत्पादन घेणे शक्य आहे. कारण महाधान क्रॉपटेक 8:21:21 या खतांमध्ये कांदा लावल्यापासून काढणीपर्यंत कांद्याला लागणारे सर्व अन्नद्रव्ये म्हणजे मुख्य दुय्यम आणि सुष्म हे एकाच दाण्यांमध्ये म्हणजे आठ अन्नद्रव्य दिल्यामुळे ह्या गोष्टी आपल्याला सहज शक्य होत असतात. म्हणून सर्व शेतकऱ्यांनी आधुनिक पद्धतीची टेक्नॉलॉजी वापरून कांदा पिकामध्ये खत व्यवस्थापन करणे गरजेचे आहे.सर्व शेतकऱ्यांनी महाधन क्रॉपटेक खताबद्दल विश्वास दाखवला आणि अशा पद्धतीची टेक्नॉलॉजी वापरून आपलं उत्पादन भरघोस वाढवावं असं सर्व शेतकऱ्यांनि सांगितलं कार्यक्रमाचे नियोजन जगताप कृषी सेवा केंद्र भिगवण यांनी केले होते. यावेळी कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी साखर कारखान्याचे संचालक सतीश काळे, भीमराव वाघ, सुनील कांळगे, हितेश जाधव ,प्रमोद मोरे, नेमिनाथ धुमाळ ,सुनील ढवळे प्रमोद वाघ आदि पदाधिकारी व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.









