अविनाश पोहरे
ब्युरो चिफ, अकोला
पातूर : स्थानिक सिदाजी महाराज मंदिर सभागृहात ब्रह्माकुमारीज परिवार पातूर च्या वतीने आयोजित श्रीमद भगवत गीता ज्ञान यज्ञ सप्ताहाचे उदघाटन दि 23 नोव्हेंबर गुरुवारी दुपारी 3 वाजता मोठ्या उत्साहात संपन्न झाले. उदघाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राजयोगिनी ब्रह्माकुमारी सुमन दीदी अकोला, उदघाटक आमदार नितीन देशमुख बाळापूर विधानसभा, विशेष उपस्थिती भगवत गीता प्रवचनकार ब्रह्माकुमारी भारती दीदी कटणी मध्यप्रदेश, प्रमुख उपस्थितीत संगिताताई अढाऊ अध्यक्षा जी प अकोला,सुनिताताई टप्पे सभापती पं स पातूर,रवि काळे तहसीलदार,किशोरजी शेळके ठाणेदार,महादेवराव गणेशे अध्यक्ष यात्रा मंडळ सिदाजी महाराज संस्थान,रामदास खोकले अध्यक्ष श्री सिदाजी महाराज संस्थान,ब्रह्माकुमारी लीना दीदी पातूर इत्यादी मान्यवर उपस्थित होते.ब्रह्माकुमारीज सेवा केंद्र पातूर च्या वतीने ब्रह्माकुमारी स्नेहलता दीदी, ब्रह्माकुमारी स्वाती दीदी वाशिम, ब्रह्माकुमारी वैशाली दीदी हिवरखेड यांनी उपस्थित सर्व मान्यवरांचे स्वागत केले. तर ब्रह्माकुमार श्यामभाई यांनी सुमधुर आवाजात स्वागत गीताने मान्यवरांसह सर्व उपस्थिताचे स्वागत केले.पातूर तालुक्यात मागील अनेक वर्षांपासून ब्रह्माकुमारीज विद्यालयाकडून ईश्वरिय संदेश घरोघरी पोहचविण्याचे काम केले जात आहे प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाचा विस्तृत परिचय ब्रह्माकुमार प्रा. अतुल विखे यांनी करवून दिला. बिके लीना दीदींनी मान्यवर उपस्थित राहल्याबद्दल सर्वांचे विशेष स्वागत करून सर्वाना विद्यालयाकडून स्नेह भेट दिली. उदघाटक म्हणून मनोगत व्यक्त करताना आमदार नितीन देशमुख यांनी ब्रह्माकुमारीज संस्थेच्या समाजउपयोगी अध्यात्मिक कार्याची भरभरून प्रशंसा केली.पातूर शहरात व तालुक्यात ब्रह्माकुमारीज विद्यालयाच्या सेवेची व ज्ञानाची व्याप्ती वाढण्यासाठी आवश्यक सहकार्य करण्याचे आश्वासन देशमुख यांनी दिले.अकोला जिल्हा परिषद अध्यक्षा संगीताताई अढाऊ यांनी मनुष्य जीवनात मनःशांती साठी आध्यत्मिक ज्ञान आवश्यक असून कोणतीही जाती धर्माची बंधने न ठेवता प्रत्येकाला राजयोग जाणून घेन्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन केले.मनोगत व्यक्त करताना ब्रह्माकुमारी सुमन दीदींनी ईश्वरीय कार्यात तन मन धनानी सहयोग करून विविध उपक्रमाच्या माध्यमातून ईश्वरीय सेवा करीत असल्याबद्दल संचालिका लीना दीदी व प्रभादीदी सह सर्व पातूर ब्रह्माकुमारीज परिवारातील ज्ञानार्थी भाऊ बहिणींचे विशेष कौतुक केले. प्रसंगी शंकरराव नाभरे अध्यक्ष श्री रेणुकामाता संस्थान पातूर, महादेवराव गणेशे,रामदास खोकले इत्यादि मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले.सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते आरती घेऊन प्रवचन मालेला सुरुवात करण्यात आली. पहिल्याच दिवशी पातूर कराची लक्षणिय उपस्थिती होती.23 नोव्हेंबर ते 29 नोव्हेंबर या सात दिवस ही प्रवचन माला सुरु राहणार आहे मध्यप्रदेश राज्यातील कटनी शहरातील ब्रह्माकुमारी सेवा केंद्राच्या संचालिका असलेल्या प्रवचनकार ब्रह्माकुमारी भारती दीदी अतिशय सहज आणि सरळ भाषेत संगीतमय वातावरणात व सुमधुर वाणीने श्रीमद भगवत गीचे ज्ञान आजच्या परिस्थितीत कसे उपयुक्त आहे हे समजावून सांगतात.हा भगवत गीता ज्ञानाच्या प्रवाचनाचा लाभ अधिकाधिक लोकांनी घ्यावा असे आवाहन आयोजकडून करण्यात आले आहे. कार्यकर्माचे सूत्रसंचालन ब्रह्माकुमारी प्रभा दीदींनी केले तर आभार ब्रह्माकुमारी भागिरथी दीदींनी मानले.उदघाट्न कार्यक्रमाच्या पूर्वी 23 नोव्हेंबर ला सकाळी 9 वाजता भारती दीदींच्या सन्मानार्थ पातूर शहरातील मुख्य रस्त्यावरून मार्गक्रमण करीत भव्य रथ यात्रा काढण्यात आली. पातूर वासियांनी ठिकठिकाणी भारती दीदी व लिना दीदींचे सत्कार स्वागत केले.या भगवत गीता ज्ञान सप्ताह नियोजन करण्यासाठी ब्रह्माकुमारी ज्योती दीदी संचालिका ब्रह्माकुमारीज सेवा केंद्र रिसोड यांचे विशेष सहकार्य मिळाले.कलश रथ यात्रा व उदघाट्न समारंभ यशस्वी करण्यासाठी ब्रह्माकुमार विशाल भाई अकोला, श्याम भाई तेल्हारा,मनोजभाई अकोला,रवि अंभोरे रिसोड, बिके प्रियंका दीदी कटनी यांच्या सह पातूर ब्रह्माकुमारीज सेवा केंद्र तथा गीता पाठ शाळाच्या सर्व बहिणींनी बहुमूल्य सहकार्य केले.