मधुकर बर्फे
तालुका प्रतिनिधी पैठण
पैठण : महाराष्ट्र राज्यांचे रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री तथा छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री ना. संदीपान पा.भुमरे साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीमधे पैठण तालुक्यातील पिंपळवाडी (पि) सर्कल मधील पैठण कातपुरचे युवा तरूण तडफदार तसेच उभरते नेतृत्व असे उपसरपंच विजय भाऊ खडसन यांच्या सह कातपुर गावचे तंटामुक्ती अध्यक्ष रामजी नाना मोरे यांनी २१. नोव्हेंबर रोजी शिवसेना ( शिंदे गट ) या पक्षामध्ये आपल्या समर्थकांसह जाहीर प्रवेश केला आहे कातपुरचे उपसरपंच विजय खडसन व रामजी नाना मोरे यांचे पैठण तालुक्यांचे भावी आमदार विलास बापू भुमरे यांनी स्वागत करुन पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.यावेळी संभाजीनगरचे दुध संघाचे अध्यक्ष नंदु आण्णा काळें,नाथ संस्थाने दादा बारे , शिवसेना तालुका आध्यक्ष अण्णा भाऊ लबडे ,कातपुरचे सरपंच धनंजय पा मोरे, चांगतपुरीचे सरपंच व कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक विठ्ठल पा.दोरखे, साईनाथ होरकटे, यांच्या सह इतरांची उपस्थित होते