मनोज भगत
ग्रामीण प्रतिनिधी तेल्हारा
हिवरखेड : हिवरखेड सेंट पॉल अकॅडमी येथे गणपती फेस्टिवल साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष सौ. निमिता गांधी होत्या. यावेळी विद्यार्थ्यांसाठी नवनवीन स्पर्धा शिक्षकांनी आयोजित केल्या या स्पर्धेमध्ये आजच्या काळामध्ये मध्ये फक्त पुस्तकी ज्ञान न पाहता त्यांना सर्व गुण संपन्न होण्यासाठी शिक्षकांनी मार्गदर्शन केले स्पर्धेचे नाव वन ॲक्ट प्ले चित्रकला मोदक आणि कुकिंग विदाऊट फायर अशा अनेक स्पर्धा घेण्यात आल्या. स्पर्धेमध्ये नर्सरी ते चवथी च्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. कार्यक्रमाचे आयोजन सौ येऊल मॅम, इंगोले , राजपूत मॅम आवरे मॅम , प्रीती मॅम ,अमित बाजारे सर , रहाणे ,अजय सर यांनी परिश्रम घेतले. सेंट पॉल अकॅडमीचे अध्यक्ष नवनीतजी लाखोटिया , उपाध्यक्ष लून करणजी डागा ,सचिव प्रमोद चांडक तसेच प्राचार्य चंद्रकांत तिवारी सर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम घेण्यात आले.











