Today Rashi Bhavishya, 30 August 2022 : जाणून घ्या आपल्या राशीसाठी आजचा दिवस कसा असणार आहे आणि काय आहे बारा राशींचं भविष्य.
मेष (Aries Horoscope Today ):-
जुनी येणी वसूल होतील. आवडीच्या पदार्थांचा आस्वाद घ्याल. दिवसभर प्रसन्नता राहील. घरगुती कामे मनाजोगी पार पडतील. पालकांचे शुभ आशीर्वाद मिळतील.
वृषभ (Taurus Horoscope Today ):-
आपल्या वागण्या बोलण्यात मृदुता दिसून येईल. थोडे कमी बोलण्यावर भर द्या. मनातील सर्व चिंता काढून टाकाव्यात. निर्भीडपणे कार्यरत राहावे. कामातून मिळणार्या फळाकडे फार महत्त्व देऊ नका.
मिथुन (Gemini Horoscope Today ):-
मानसिक स्थैर्य बाळगा. स्वप्नाळू वृत्तीतून बाहेर या. पैशांचा उपयोग गरजेसाठी करावा. कौटुंबिक चर्चा हिताची ठरेल. नियमित व्यवहारात खंड पडू देऊ नका.
कर्क (Cancer Horoscope Today ):-
गोंधळलेल्या अवस्थेतून बाहेर या. मनातील इच्छा पूर्णत्वास जाईल. चूक मान्य करावी. नात्यातील कटुता टाळण्याचा प्रयत्न करावा. भौतिक सुखावर खर्च कराल.
सिंह (Leo Horoscope Today ):-
बक्षिसास पात्र व्हाल. वरिष्ठांची मर्जी सांभाळा. कामे समाधानकारकरित्या पार पडतील. नवीन योजनांवर काम चालू करण्यास उत्तम दिवस. आत्मविश्वास वाढीस लागेल.
कन्या (Virgo Horoscope Today ):-
घरात धार्मिक कार्यासंबंधी बोलणी कराल. डोकेदुखीचा त्रास संभवतो. व्यस्त दिनक्रमामुळे थकवा जाणवेल. दिवस बर्यापैकी अनुकूल राहील. ज्येष्ठ बंधुंचे सहकार्य लाभेल.
तूळ (Libra Horoscope Today ):-
आपलाच विचार पारखून घ्यावा. जोडीदाराचा विचार जाणून घेऊन मगच प्रतिक्रिया द्या. विद्यार्थी नवीन गोष्टी शिकण्यास उत्साही राहतील. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. मुलांकडून आनंद वार्ता मिळतील.
वृश्चिक (Scorpio Horoscope Today ):-
संपर्कातील लोकांचे सहकार्य लाभेल. जुनी येणी वसूल होतील. मन प्रफुल्लित व प्रसन्न राहील. वैवाहिक जीवन सुखमय राहील. एखादी नवीन ओळख होईल.
धनू (Sagittarius Horoscope Today ):-
मनाची चंचलता काबूत ठेवा. तुमचा सल्ला विचारात जाईल. व्यायामाची आवड निर्माण होईल. तुमच्या ज्ञानात भर पडेल. गुंतवणूक करताना सारासार विचार करा.
मकर (Capricorn Horoscope Today ):-
गूढ विचारात रमून जाल. मुलांशी मन मोकळ्या चर्चा कराल. दिवस खिलाडु वृत्तीने घालवाल. घरातील वातावरण तप्त राहू शकते. उगाचच विरोध दर्शवू नका.
कुंभ (Aquarius Horoscope Today ):-
घरातील कामे आवडीने कराल. कौटुंबिक गोष्टींत अधिक वेळ घालवाल. हातातील अधिकारात वाढ होईल. मित्रांचे मोलाचे सहकार्य लाभेल. भागीदारीत समाधानी राहाल.
मीन (Pisces Horoscope Today ):-
बरेच दिवस वाट पाहत असलेल्या उत्तराची प्रतीक्षा संपेल. जोडीदाराकडून अनपेक्षित लाभ होईल. जबाबदारी वाढण्याची शक्यता. निसर्ग-सौंदर्यात रमून जाल. संपूर्ण क्षमतेने कार्यरत राहाल.
– ज्योतिषी विद्याधर करंदीकर