शरद भेंडे
तालुका प्रतिनिधी अकोट
यवतमाळ : येथील पत्रकार संघाचे आंदोलन यशस्वी रित्या पार पडले महाराष्ट्र राज्य ग्रामीण पत्रकार संघटनेच्या वतीने यवतमाळ येथील जिल्हाधिकारी अमोल जी येडगे यांना केंद्रीय सदस्य व अधिकारी, पदाधिकारी यांच्या हस्ते निवेदन सादर करण्यात आले यावेळी जिल्हाधिकारी म्हणाले की असा घोटाळा मी मुळीच खपून घेणार नाही यांचे सत्य काय आहे त्याची सविस्तर चौकशी करून मी आपल्याला समितीच्या वतीने माहिती देणार असल्याचे आश्वासन दिले यावेळी राज्याध्यक्ष वाघमारे यांनी या चौकशी समितीमध्ये महाराष्ट्र राज्य ग्रामीण पत्रकार संघटनेचे आमचे दोन सदस्य घ्यावे अशी विनंती केली असता जिल्हाधिकारी यांनी ती मान्य केले आणि अविनाश भाऊ राठोड, गजानन भाऊ वाघमारे यांचे नाव आपण त्यांना दिले, खनिज घोटाळ्याप्रकरणी आपल्या सदस्य समोर समिती चौकशी करून आपणास सत्य माहिती देण्यात येईल आणि त्वरित चौकशी करून कारवाई करणार असल्याचे आश्वासनही दिले असून आम्ही या घोटाळ्याला थारा देणार नाही असे जिल्हाधिकारी म्हणाले.
या राज्यव्यापी आंदोलन मध्ये म.रा.ग्रामीण पत्रकार संघाचे राज्य अध्यक्ष गजानन भाऊ वाघमारे राज्य सचिव राजेश डांगटे, राज्य उपाध्यक्ष शैलेश अलोने राज्य सहसचिव अविनाश राठोड विदर्भ अध्यक्ष प्रवीण रापत्तीवार विभागीय उपाध्यक्ष अहमद भाई शेख,जील्हा उपाध्यक्ष मनोहरराव गोलाईत, कमलेश जी राठी, तालुका अध्यक्ष वीठ्ठलराव गुजरकर, तालुका कार्याध्यक्ष अरुण भाऊ काकड, कोमावार, विदर्भ प्रवक्ता गोपाल नारे बुलढाणा जिल्हा अध्यक्ष अमोल बापू देशमुख गोवर्धन चव्हाण.दत्ता भगत नरेंद्र कोंडे.शरद वालशिगे.शरद भेंडे यांचे हजेरीत पार पाडले.यावेळी पत्रकार संघाचे तालुका सदस्य हजर होते