अविनाश पोहरे
ब्युरो चिफ, अकोला
पातूर : पातूर येथील शासकीय विश्रामगृह येथे पत्रकार बांधवांचा सत्कार कार्यक्रम आयोजित पत्रकार बांधवांवर प्रेम असलेल्या व पत्रकार होण्याची आवड असलेले देशाच्या रक्षणासाठी अहोरात्र झटणारे देश प्रेमी सागर चव्हाण (SISF ASG ) यांच्याकडून समस्त पातुर शहरातील पत्रकार यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी पत्रकार राजाराम देवकर यांनी देशासाठी आपल्या जीवाची परवा न करता आपल्या प्राणाची आहुती देतात व आपले रक्षण करतात हा सत्कार तर आम्ही पत्रकार बांधवांनी केला पाहिजे पण त्यांचे पत्रकार प्रेम व पत्रकार होण्याची आवड असल्यामुळे सागर चव्हाण यांनी आपला सत्कार केला. सैनिकांप्रती आपले मत मांडताना पत्रकार राजाराम देवकर भावुक झाले.पत्रकार देवानंद गहिले यांनी सुद्धा आपले मत मांडतांना आपल्या देशाच्या सेवेसाठी हे सैनिक आहेत म्हणून आपण सुरक्षित आहोत त्यांचे आपण जेवढे कौतुक करू तेवढे अपुरे आहे.सागर चव्हाण यांनी आमचा सत्कार केला आम्हाला सन्मान दिला त्यांचे मी मनापासून आभार मानतो असे त्यांनी म्हटले.यावेळी किरणकुमार निमकंडे, निखिल इंगळे, रक्षण देशमुख यांनी आपले सैनिकांप्रति मत मांडली. तसेच जेष्ठ पत्रकार राजाराम देवकर, जेष्ठ पत्रकार देवानंद गहिले, रामेश्वर वाढी,किरणकुमार निमकंडे,अविनाश पोहरे,रक्षण देशमुख, निखिल इंगळे,सतीश कांबळे,साजिद सर इ. पत्रकार उपस्थित होते.











