रविकुमार येमुर्ला
ग्रामीण प्रतिनिधी, सिरोंचा
सिरोंचा : तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत आणि नगरपंचायत आरोग्य विभागाचे आशा सेविका आणि गट प्रवर्धक सिरोंचा अंतर्गत कार्यरत सर्व स्वयंसेविका कोविड १९ वे संसर्गजन्य आजार सुरू झाल्यापासून अहोरात्र मेहनत घेउन स्वतःची जिवाची परवा न करता काम केले आहे, कोविड १९ आजारासंबंधी लोकांमध्ये जणजागृती निर्माण करने त्याना योग्य रित्या आरोग्याची काळजी द्यायला लावणे, वरिष्ठ अधिकारी यांनी वेळोवळी सांगितल्यानुसार अथवा दिलेल्या आदेशानुसार दिवस रात्र सेवा म्हणून तेव्हा घरोघरी जाउन कोविंड पाझिटीव्ह निघालेल्या व्यक्तींचा संपर्कात आलेल्या सर्व व्यक्तीचा आरोग्याची विचारपुस करून त्याच्या आरोग्याचा स्थितीबद्दल वरिष्ठ अधिकारयाणा वेळोवळी कळविने असे इत्यादी प्रकारचे कामे तालुक्यातील आशा स्वयंसेविका केली आहे,
याबाबत तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत अंतर्गत कार्यरत आशा स्वयंसेविकांना शासन परीपत्रक कमांक चौतिआ. २०२० / प्र.क्र.४२/वित्त -४ ग्राम, वि. विभाग दिनांक ३१.०३.२०२० अन्वये माहे एप्रिल २०२० पासून दर माह १००० रूपये अतिरीक्त मानधन देण्याचा ठरविण्यात आले होते, सोबतच नगरविकास विभागाद्वारे देखील नगरपंचायत कार्यक्षेत्रात कार्यरत आशा स्वयंसेविकांना उपरोक्त संदर्भ शासन निर्णय क्रमांक १ , मुद्दा क्रमांक ७ वर मोबदला करणेसंबंधी नमुद करण्यात आले.मात्र केलेली कामाच्या मोबदला मिळेल या आशेने आपल्या कार्यlलयात आज पर्यंत केलेल्या कोविड १९ अंतर्गत कामाशी निवडीत एकही रुपये ग्रामपंचायत आणि नगरपंचायत कडून मिळाली नाही, त्यामुळे कोरोना अंतर्गत काम करण्यासाठी इच्छुक नाही, कोविड 19 कामाचा जो पर्यंत जुना मोबदला आमच्या हातात येणार नाही तो पर्यंत आम्ही काम करणार नाही. असे तालुक्यातील सर्व आशा सेविकांनी सिरोंचा तहसील कार्यालयात आणि पंचायत समिती कार्यालयात निवेदन देण्यात आली आहे.