देवेंद्र बिसेन
जिल्हा प्रतिनिधी गोंदिया
गोंदिया : हाँकीचे महान जादुगार, स्वातंत्र्यपूर्व काळात आयोजित ओलंपीक स्पर्धांमध्ये भारताला सांघिक खेळ हाँकीचे प्रथम सुवर्ण पदक मिळवून देणारे, जर्मनीचे तत्कालीन हुकुमशहा अडाँल्फ हिटलर यांच्यासमोर त्यांनी दिलेल्या आमिशाला बळी न पडता भारत देशाप्रती निष्ठा व अभिमान व्यक्त करणारे स्वर्गीय मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिवस दि. 29 आँगष्ट संपूर्ण भारतात क्रिडा संस्कृती विकसित करण्यासाठी , क्रिडा क्षेत्राचे महत्त्व विषद करण्यासाठी दरवर्षी राष्ट्रीय क्रिडा दिवश म्हणून साजरा केला जातो. त्याचप्रमाणे गोंदिया जिल्हा क्रिडा विभागाचे वतीने ही जिल्हा क्रिडा संकुल परिसरात राष्ट्रीय क्रिडा दिन साजरा करण्यात आला . तसेच विविध क्रिडा स्पर्धांमध्ये प्राविण्यप्राप्त खेळाडू व शाळांना पुरस्कार देण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा शिक्षणाधिकारी (प्राथ.) मा.श्री डाँ. महेंद्र गजभिये सर. कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा कोषागार अधिकारी मा. श्री आंबोडे सर, सहाय्यक जिल्हा कोषागार अधिकारी मा. श्री खंडारे सर, श्री तिर्थराज ते. उके ( विस्तार अधिकारी , महिला व बालकल्याण विभाग, पं.स.गोंदिया) यांची उपस्थिती होती. तालुका क्रिडा अधिकारी मा. श्री मरसकोल्हे सर यांनी कार्यक्रमाचे संचालन व प्रस्तावना केली. क्रिडा मार्गदर्शक मा. श्री उईके सर , क्रिडा विभागाचे अन्य अधिकारी, कर्मचारी, क्रिडा प्रशिक्षक मा. श्री चेतन मानकर, मा.श्री अंकुश गजभिये, मा. श्री अतुल बिसेन सर्व हजर होते.