देवेंद्र बिसेन
जिल्हा प्रतिनिधि गोंदिया
आज दि .१६ रोजी डी बी एम शारिरीक शिक्षण महाविद्यालयात स्वच्छ भारत अभियान मार्फत स्वच्छता व मेरी माटी मेरा देश ह्याचा संदेश देण्याकरीता आज स्वच्छता अभियानाला महाविद्यालयातुन शुरू करण्यात आली. त्यानंतर चावडी चौकात सफाई करण्यात आली व लोकामध्ये जागरुकता येणे गरजे चे आहे करिता सफाई किती महत्वाचे आहे व याचा संदेश देण्यात आले. ह्यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डाँ अमित बुध्दे यांनी स्वच्छता विषयी आपले मत व्यक्त केले. व राष्ट्रीय सेवा योजना अधिकारी प्राचार्य डाँ लालचंद पारधी ह्यांनी पण आपले मत स्वच्छता विषयी व्यक्त केले, ह्यावेळी संस्थेचे अध्यक्ष प्रा अर्जुन बुध्दे,सचिव डाँ इंदिरा सपाटे, उपाध्यक्ष डाँ अनिल बुध्दे, डाँ श्रीकांत मानकर, डाँ सुनिता बांते, डाँ सुषमा गौर, व इतर सर्व मोठ्या संख्येत हजर होते.