सचिन बनसोड
शहर प्रतिनिधी गोंदिया
गोंदिया : केंद्राच्या मोदी सरकारला प्रत्येक सर्वे मध्ये त्यांचा त्याला पराभव दिसून येत आहे आणि दुसरी कड़े देशाचे जननायक व गोरगरिबांचे नेते राहुल गांधी यांच्या वाढत्या प्रभावाला घाबरून ते आता देशात दंगे भडकवून धार्मिक व जातीय तिढा निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत.महाराष्ट्रातही त्यांनी अनेक वेळा अशांती पसरवण्याचा प्रयत्न केला परंतु ते असफल झाले म्हणून त्यांना पक्ष फोडून सरकार बनवावे लागले आता सरकार आल्यानंतर धार्मिक दंगे कसे पसरवता येईल म्हणून त्यांनी संभाजी भिडे नावाच्या व्यक्तीला संरक्षण देऊन महाराष्ट्र राज्यात दंगे पसरवण्याचं ठेका दिला आहे आणि त्याच परिपाठीने दिनांक 27 जुलैला अमरावती जिल्ह्यामध्ये संभाजी भिडे नी राष्ट्रपिता महात्मा गांधी व यांच्या मातेपितेविरुद्ध अपशब्द वापरून त्यांना मुस्लिम समाजाचा मुलगा आहे असं वक्तव्य करून विदर्भात दंगे पसरवण्याचं प्रयत्न केला आहे. संभाजी भिडे च हे पहिलंच प्रयत्न नाही याच्या आधीही त्यांनी महिलांबद्दल अभद्र टिपणी केल्या आहेत तसेच धार्मिक रूपानेही त्यांनी अनेकदा अपशब्दाचा प्रयत्न केला आहे. अशा अपशब्दाचा प्रयत्न करून अशांतता पसरवणाऱ्या व्यक्ती महाराष्ट्राच्या ईडी सरकार मध्ये मोकाट्याने फिरत आहे हे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हा मोठा अपयश आहे आणि त्यांच्या विदर्भातच आता भिडे दंगे पसरवण्याचा प्रयत्न करत आहेत म्हणून काँग्रेस सेवादला ची मागणी आहे की ह्या भिडे नावाच्या व्यक्तीला लवकरात लवकर अटक करून विदर्भात व संपूर्ण महाराष्ट्रात शांतता कायम ठेवावी.आज राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेसमोर काँग्रेस सेवा दलाच्या नेतृत्वात जोडे मारो आंदोलन करण्यात आला यावेळीकांग्रेस प्रदेश सचिव अमर भाऊ वराडे सेवादल, जिलाध्यक्ष इंजि राजीव ठकरेले, एनएसयूआई जिला अध्यक्ष हरीश तुलसकर, शहर महासचिव आलोक मोहंती, तालुका महासचिव रंजीत गणवीर, ओबीसी विभाग जिला महासचिव जीवन शरणागत, पूर्व तालुका अध्यक्ष दिलीप गौतम, मोहित राहंगडाले, रवि रिणायत, मनीष चौहान, युवक कांग्रेस जिला सचिव मंथन नंदेश्वर, सुनील भूंगाड़े, दीपेश अरोरा, दिपक ऊके, कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.