सचिन बनसोड
शहर प्रतिनिधी, गोंदिया
गोंदिया : लोधी लोधा लोध जाती ला केंद्राच्या ओबीसीच्या यादीत समाविष्ट करण्याची मागणी ही सन २००४ पासून अरखळलेली असून महाराष्ट्र च्या सुशील कुमार शिंदे यांच्या सरकारने लोधी समाजाच्या आर्थिक, सामाजिक, राजनीतिक व शैक्षणिक परिस्तिथी ला पाहून सन २००४ मध्ये ह्या जातीला राज्याच्या ओबीसीच्या यादीत समाविष्ट केला होता तसेच लोधी समाज हे देशात 18 राज्यात राहत असून १४ राज्यांमध्ये हे राज्यात व केंद्रात दोन्हीत ओबीसीच्या यादीत व २ राज्यत म्हणजेच आपल्या महाराष्ट्राला लागून असलेल्या उडीसा व पश्चिम बंगालमध्ये ही जाती शेड्युल ट्राईब (ST) मध्ये राज्यात व केंद्रात ही आहे. १८ राज्य पैकी १६ राज्यांमध्ये लोधी समाजाला बरोबर संविधानिक न्याय मिळत असून थोर महापुरुषांची भूमी जिथे छत्रपती शिवरायांनी स्वराज्य स्थापित करून गोरगरिबांना न्याय दिला, ज्या महाराष्ट्राच्या भूमीवर आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज जन्माला आले, ज्या महाराष्ट्रात परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधानाचे शिल्पकार बनले ज्यांनी मायरूपी संविधान या देशाला दिला, स्त्री शिक्षणासाठी सावित्री आई पुढे आली, बहुजनाचे जननायक महात्मा ज्योतिबा फुले झाले अशा थोर महापुरुषांच्या राज्यात लोधी समाजाला आजपर्यंत न्याय मिळू शकला नाही ही मोठी खंत लोधी समाजाच्या मनात आहे. म्हणून पुढची वाटचाल तैयार करण्यासाठी 13 अगस्त ला वीरांगना राणी अवंतीबाई लोधी सामाजिक संघटनेचे अध्यक्ष सुभाष नरोलीया यांच्या अध्यक्षतेत काटोल येथे राज्यस्तरी सभा घेण्यात येणार आहे. लोधी समाजाला केंद्राच्या यादित पासून वंचित आहे त्याकरिता समाजाच्या वेगवेगळ्या संघटनेच्या माध्यमातून मागच्या १९ वर्षापासून संघर्ष करीत आहे यासाठी २०१६ मध्ये देशाच्या राजधानी दिल्लीत मोठा “लोधी जन अधिकार आंदोलन” उभारण्यात आला २०१७ मध्ये लोधी समाजाचे नेते इंजि राजीव ठकरेले यांच्या यांनी आमरण उपोषण केले त्यानंतर सलग पूर्ण महाराष्ट्रात जिल्ह्यात – जिल्हात आंदोलने उभारण्यात आले प्रत्येक बड्या नेत्यांना, मंत्र्यांना निवेदन देण्यात आले सगळ्यांनी आश्वासन दिले की लवकरच तुमची मागणी पूर्ण करू पण १९ वर्ष लोटून गेले. काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप, शिवसेना सगळे पक्ष सत्तेत येऊन गेले तरी सुद्धा लोधी समाजाला न्याय कुणीच दिला नाही.
येणाऱ्या २०२४ च्या लोकसभा तसेच विधानसभेच्या निवडणुकीच्या आधी परत लोधी समाजाला अपेक्षा आहे की राष्ट्रीय मागासलेल्या वर्गाच्या आयोगावर आपल्या विदर्भाच्या चंद्रपुर जिल्ह्याचे माजी खासदार हंसराज अहिर हे अध्यक्षपदी असून विदर्भात लोधी समाज हा मोठ्या संख्यांना राहतो लोधी समाजाच्या अनेको बडे नेत्यांचा संबंध त्यांच्यासोबत असल्ने आता अशी अपेक्षा आहे की त्यांच्या कार्यकाळात लोधी समाजाला न्याय मिळू शकेल व निवडणुकीच्या आधी लोधी समाजाला आपल्याकडे वळवण्यासाठी सत्ताधारी न्याय देतील अशी अपेक्षा समाजाला आहे। समाजतील सगळे संघटन एक होऊन आता एकोप्यानं आपल्या संविधानिक अधिकारासाठी लढण्यास सुसज्ज झाले आहेत यासाठी पहिली बैठक आज गोंदिया येथे लोधी समाजाच्या सभागृहात झाली असून बैठकीत जिलेचे नेते व माजी आमदार भेरसिंगभाऊ नागपुरे, लोधी अधिकार जन आंदोलनाचे प्रणेते इंजि राजीव ठकरेले, जिल्हा परिषद सदस्या छायाताई नागपुरे, गीता ओम लिल्हारे, आलोक प्रांताध्यक्ष अनंतलाल दमाहे, राष्ट्रीय अध्यक्ष बघेले, लोधी सेवा समितीचे अध्यक्ष जागेश्वर लिल्हारे, लोधी कर्मचारी अधिकारी संघाचे अध्यक्ष रामेश्वर लिल्हारे, आलोक संघटनेचे राज्याचे उपाध्यक्ष रोशनलाल लिल्हारे, पुर्व प. स. सभापती यादनलाल बनोटे, जितेंद्र बलारे, लोधी समाज तुमसर चे कोषाध्यक्ष खुशाल नागपुरे, लोधी समाजाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर बिरनवारे, लोधी समाज गोंदिया अध्यक्ष सुनील लिल्हारे, रुपलाल नागपुरे, नंदकिशोर बिरणवार, कवि हेमंत मोहारे, निखिल चिखलोंडे, शंकर नागपुरे, स्वरस्वता बाई नागपुरे, मालती नागपुरे इत्यादि मान्यवर उपस्थित होते.