राजेंद्र पोटफोडे
ग्रामीण प्रतिनिधी, अमरापूर
अमरापूर: आजादी का अमृत महोत्सवाच्या समारोपीय उपक्रमांतर्गत शेवगाव समितीच्या वतीने मेरी मिट्टी मेरा देश अभियान निमित्त विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.अमरापूर माध्य व उच्च माध्यमिक विद्यालयात इयत्ता 5 वी ते इयत्ता 10 या वर्गातील विद्यार्थ्यांची चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.झाडे लावा झाडे जगवा आजादी का अमृत महोत्सव मतदार जनजागृती अशा विषयावर चित्रे विद्यार्थ्यांनी काढली चित्र रेखाटताना विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद होता आकर्षक रंग वापरून कल्पकतेने चित्र रेखाटली प्रत्येक गटातून प्रथम द्वितीय तृतीय क्रमांकाची निवड करण्यात आली या विद्यार्थ्यांना कलाशिक्षक अशोक तरसे यांचे मार्गदर्शन लाभले.यावेळी आव्हाणे केंद्राचे केंद्रप्रमुख सुभाषराव आंबेडकर प्राचार्य गणपत शेलार शशिकांत काकडे अशोक जाधव उपस्थित होते.