शेख इरफान
जिल्हा प्रतिनिधी, यवतमाळ
उमरखेड – शहरातील ए वन फंक्शन हॉल येथे पार पडलेल्या ऑल इंडिया मजलीसे इतेहादुल मुस्लिमीन (एमआयएम)
पक्षाच्या हालात हाजरा या जाहीर सभेत पक्षाचे महाराष्ट्र कार्यकारी अध्यक्ष डॉक्टर गफार कादरी यांनी नागरिकांना संवाद साधताना आपल्या हक्काचे पक्षाला साथ देण्याचे आव्हान केले. उमरखेड शहरात २०१६ च्या सार्वत्रिक नगरपरिषद निवडणुकीत एमआयएम पक्षाने आठ जागा जिंकून मोठी भरारी घेतली होती तसेच अल्पसंख्याक मतावर पकड मजबूत करत पाच वर्षात एमआयएम पक्षाच्या पदाधिका-यांनी शहरातील नागरिकांमध्ये आपले कार्याच्या माध्यमातोण ओळख निर्माण केली आहे. तसेच पुन्हा एकदा एम आय एम जिल्हा अध्यक्ष पदाची कमान उमरखेडला मिळाल्यामुळे पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह पाहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर पक्षाच्या वतीने नांदेड रोड परिसरातील ए वन फंक्शन हॉल मधे हालाते हाजरा या जाहीर सभेत एम आय एम महाराष्ट्र कार्यकारी अध्यक्ष डॉक्टर गफ्फार कादरी, मराठवाडा अध्यक्ष फिरोज लाला, विदर्भ अध्यक्ष शाहिद रंगूनवाला, मराठवाडा जनरल सेक्रेटरी अब्दुल माजीद बशीर, भिम टायगर सेनाचे अध्यक्ष दादासाहेब शेळके यांनी आपले विचार मांडले. या सभेमध्ये जमलेले नागरिकांना संबोधित करताना पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष म्हणाले सध्या देशात मनिपुर हरियाणा व जयपूर मुंबई ट्रेन मध्ये झालेले घटनेला पाहून मानसून होऊन जात आहे तसेच आपले हक्कासाठी आपल्याला मजबूत होण्यासाठी आपल्या हक्काचे पक्षाला साथ देण्याची गरज असल्याचे आव्हान डॉक्टर गफ्फार कादरी यांनी केले.