प्रकाश केदारे
तालुका प्रतिनिधी, पाथरी
लहान वयातील मुलाच्यां दातांची व आरोग्याची काळजी घ्या.असे येथील दंततज्ञ डाॅ.जितेंद्र वर्मा व डाॅक्टर हे परमार्थी संत आहेत असे जेष्ठ पत्रकार व संपादक के.डी.वर्मा यांनी मानवत मधील जेष्ठ दंततज्ञ डाॅ.ज्योती डंमढेरे यांच्या दंत रूग्णालयात आयोजित कार्यक्रमात ” दंत तपासणी शिबीराच्या आयोजन प्रंसगी आपले विचार व्यक्त करताना सांगितले.प्रारंभी दिपप्रज्वलन डाॅ.वर्मा व पत्रकार वर्मा व डाॅ.शरयु खेकाळे व डाॅ.ज्योती डमढेरे यांच्या हस्ते करण्यात आले.धन्वंतरी यांच्या प्रतिमेला उपस्थित मान्यवरांचे हस्ते पुष्षहार अर्पण करण्यात आले.आपले विचार व्यक्त करतांना डाॅ.वर्मा यांनी दाताच्या रोगाविषयी व उपायाविषयी माहिती देतानां रूग्णानां गैरसमज होऊ नये म्हणुन काळजी घ्यावी.त्याच बरोबर लहान मुलांच्या दाताविषयी व आरोग्याविषयी काळजी घेणे गरजेचे आहे.वयाच्या 12 वर्षापंर्यत निगा राखावी.अधिक लाडापायी लहान मुलानां अधिक गोड व चाॅकलेट देऊ नये.हि सवय लागल्याने कोवळ्या वयात दात हे नाजुक असतात.पक्के दात येऊ स्तर दंत चिकित्सकानां दाखवावे.दाताला जर किड लागली असेल तर डाॅक्टरांना दाखवा.निष्काळजी करू नका.थंड व गरम पाण्याने दातानां ठणक लागते.वेळोवेळी दातांची निगा राखा व तपासणी करूण घेणे.दात हे आपल्या शरिराचे सर्वात महत्वाचे अवयव आहे.असे डाॅ.जितेंद्र वर्मा यांनी मार्गदर्शन करतांना सांगितले.तर प्रमुख पाहुणे पत्रकार के.डी.वर्मा यांनी आपले विचार व्यक्त करतांना सांगितले.जसे संत महात्मे समातील लोकांचे जिवन चांगल्या रितिने जावेत व कल्याण होण्यासाठी तन-मनाने मार्गदर्शन म्हणुन मार्ग दाखवतात तसेच कार्य डाॅक्टर करून रूग्णानां वाचवण्यासाठी काळजीपुर्वक उपचार करून रूग्णांचे जीव वाचवतात. एका संतानी डाॅक्टर विषयी सांगितले की डाॅक्टर हे परमार्थी संत आहेत.डाॅक्टर जेव्हां रूग्णावर उपचार करतो तेव्हां भेदभाव व करता तो रूग्णाचे जीवाचे रक्षण करतो.व योग्य उपचार करतो,ज्या रूग्णाचे विश्वास त्या डाॅक्टर वर आहे.त्या रूग्णाने डाॅक्टर ला पाहिले कि त्याचे 50 टक्के दुख कमी होते.रूग्णाचा व त्याच्या नातेवाईकांचा विश्वास डाॅक्टर वर असावा.असे व पत्रकार के.डि.वर्मा यांनी सांगितले.दंतचिकित्सक डाॅ.ज्योती डंमढेरे यांनी आपल्या रूग्णालयात गेल्या पंधरा दिवसापासून अल्पदरात
दंतरूग्णाची तपासणी अभियान आयोजित करूण उपचार केले.त्या अभियानाचे समापन करण्यात आले.सुत्रसंचलन सौ.कुळकर्णी व आभार किर्ति कत्रुवार हिने मानले.