मारोती सुर्यवंशी
शहर प्रतिनिधी, नरसी
नरसी : नरसी शहरात व परिसरात “मटका” “गुटखा” अवैध दारू, रसायन मिश्रित ताडी, शिंदी विक्री जोरदार पध्दतीने चालू आहे या सर्व प्रकारच्या अवैध धंद्यांना त्वरीत थांबवून उध्वस्त होणारे कष्टकरी कामगार , शेतकऱ्यांची हजारो कुटुंबे, उघड्यावर पडणारे संसार, गुन्हेगारी कडे वळणारी तरूण पिढीला वाचवा अशी मागणी नरसी परिसरात जोर धरू लागली आहे.याबाबत सविस्तर माहिती अशी की, ठिक ठिकाणी आपले हस्तक ( एजंट ) लावून भ्रमणध्वनी (मोबाईल व्हाट्सअप ) द्वारे खुलेआम गुटखा विक्री,व अवैध मटका सुरू असताना स्थानिक पोलीस प्रशासन, तथा स्था. गु.अन्वेषण शाखा नांदेड नेमके करतात काय ? की, काही तरी चिरीमिरी घेऊन ते झोपेत आहे का ? की, झोपेचे सोंग घेऊन वरील मटका” व गुटखा” विक्री ची “खुली छूट” देत आहेत..! परीसरात अशी शंका व्यक्त करण्यात येत आहे.
परीणामी अनेकांचे संसार उद्धवस्त होत आहेत, गुन्हेगारी बेरोजगारी , चोरी, फसवणूक आशा विविध प्रकारच्या गुन्हेगारी चे दाखले आपणास दररोजच ऐकायला मिळते आहे आणि त्या सर्व प्रकारच्या अवैध धंद्यांना बंदी असताना!!.”प्रशासन जनतेच्या हितासाठी की , गुटखा व मटका किंग अवैध दारू, रसायन मिश्रित ताडी, शिंदी, विक्रेते यांच्या हुजरेगिरी करण्यासाठी!! आशा चर्चा नां नरसी व परीसरात ऊत आला आहे. याला कोणी थांबवणार की नाही? अशा अवैध धंदे सुरू असल्याने व परिसरात त्यांच्या हाताला काम नसल्याने अनेक तरूण झटपट पैसा कमावणे साठी ह्या मटका, जुगार खेळणे, दारूच्या आहारी जाऊन दिवसेंदिवस व्यसनाधीन होत आहेत. आज ना उद्या मला पैसा येणार ह्या आशेवर तो बेरोजगार तरुण आकर्षित होत आहेत व अवैध धंदे चालक लाखोंच्या लाखो रुपये कमावतात. व मटका,
जुगार खेळणारे जिंकले तर आनंदात किंवा हरले तरी टेन्शनमध्ये, गुटखा , दारू , रसायन मिश्रित ताडी,शिंदी पिणे व परिसरात भांडणे, चोरी, फसवणूक , याला लोक कंटाळले आहेत . प्रश्न मांडावा कुठं हे
नित्यनेमाने घडत आहे.या सर्व प्रकारच्या समाज विघातक कृत्यास जवाबदार कोण ? जनतेच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी महाराष्ट्र राज्य सरकारने गुटखा बंदी घातली असताना शासनाच्या नियमाला झूगारुन अवैध रितीने गुटखा, मटका जुगार खेळणे, अवैध दारू, रसायन मिश्रित ताडी,शिंदी विक्री कशी काय केली जाते ?हा प्रश्न सध्या तरी अनुत्तरित आहे… आणि विशेष म्हणजे प्रत्येक प्रकारचे अवैध धंदे रोखण्यासाठी स्था.गु.शा.नांदेड , राज्य उत्पादन शुल्क विभाग,अन्न भेसळ प्रशासन विभाग असे वेगवेगळे विभाग शाखा,विभाग प्रमुख नेमले असताना काहीच थांबत नाही असे का? नेमके हे संबंधित विभागाचे प्रमुख किंवा अधिकारी करतात तरी काय?. जर हे शक्य तितक्या लवकर थांबत नसेल तर ….. हजारो कुटुंबे, तरूण पिढी पुरते उध्वस्त झाल्या शिवाय राहणार नाही.यावर संबंधित सर्व प्रकारच्या विभागाचे प्रमुख किंवा अधिकारी काय भूमिका घेतात याकडे नरसी व परिसरातील सर्व जनतेचे लक्ष लागले आहे.