सौ.निलिमा बंडमवार
उपजिल्हा प्रतिनिधी गडचिरोली
गडचिरोली : पोलीस कर्मचारी तर एक विद्यार्थी जखमी झाला.जखमींमध्ये प्राणहिता पोलीस उपमुख्यलयातील मोहन काशिनाथ सोनकुसरे वय 54, विठ्ठल बाजीराव तोरे वय 54 हे पोलीस कर्मचारी तसेच नागेपल्ली निवासी अभिजीत ओम प्रकाश गर्गम वय 25 हा आहे.जखमी पोलीस कर्मचारी हे आलापली वरून अतिक्रमणावरील बंदोबस्त आटोपून अहेरीकडे जखमी मोहन चालवीत असलेली दुचाकी क्रमांक एम एच 33 जे 4402 ने येत असताना अहेरी वरून विना नंबरची यामाहा कंपनीची दुचाकी चालवीत असलेला जखमी अभिजीत आलापल्ली कडे जातांना शंकरराव बेजलवार महाविद्यालय जवळील लक्ष्मण नाल्याजवळ दुपारी 2.30. वाजता दोन्ही दुचाकींची टक्कर झाली.यात प्राणहीता चे पोलीस कर्मचारी मोहन हे गंभीर जखमी असून त्यांचा उजवा पाय तथा डोक्याला मार असल्याने गडचिरोली येथे पुढील उपचारार्थ अहेरीच्या उपजिल्हा रुग्णालयातून रेफर करण्यात आले.सोबतचे जखमी पोलीस कर्मचारी विठ्ठल यांना अहेरीतच उपचार सुरू असून उजवा हात व इतर ठिकाणी जखमी असलेल्या अभिजितला चंद्रपूर येथे पुढील उपचारार्थ रेफर करण्यात आले.अहेरी पोलीस स्टेशन मध्ये जखमी अभिजीत वर मोटार वाहन कायद्यानुसार कलम 184 तर भारतीय दंड संहिता 279,337 व 338 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास अहिरे चे पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली चालू आहे.











