विकास ठाकरे
तालुका प्रतिनिधी अकोला.
अकोला : जिल्ह्यामध्ये मार्च महिना संपत येत असतात उष्णतेचा पारा अकोला जिल्ह्यात चढला आहे. या दोन-तीन दिवसांमध्ये उष्णतेची लाट कायम राहणार आहे सूर्य आग ओकत आहे. मुंबई हवामान विभागाने अकोला जिल्ह्यासाठी हाय अलर्ट जारी केला आहे. भारतीय मौसम विभाग मुंबई यांचे दि. 29 मार्च 2022 चे प्राप्त संदेशानुसार दि. 29 मार्च ते 2 एप्रिल यादरम्यान
अकोला जिल्हा अधिकारी यांना बिनतारी संदेश प्राप्त झाले आहे. अकोला जिल्हा मध्ये उष्णतेची लाट येण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. सदर कालावधीमध्ये नागरिकांनी बाहेर जाण्याचे टाळावे, शारीरिक श्रमाची कामे करू नये, अशक्तपणा ,स्थूलपणा, डोकेदुखी, चक्कर येणे उस्मघात होण्याचे प्राथमिक लक्षणे आहेत त्यानुसार याबाबत तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होणार नाही याची दक्षता घ्यावी. सदर स्थितीच्या अनुषंगाने सर्व यंत्रणांनी योग्य ती दक्षता घेणे बाबत सूचित करण्यात आले आहे.