“माणसाने आपल्या इच्छा-आकांक्षा वरती आवर घातला पाहिजे” -विजयसिंह गहिलोत
किरण कुमार निमकंडे
जिल्हा प्रतिनिधी अकोला
पातुर : तुळसाबाई कावल माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय पातुर येथे श्री विजयसिंह गहिलोत व्यवस्थापक बेरार एज्युकेशन सोसायटी पातुर यांच्या 64 वा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बोलताना स्नेहाप्रभादेवी गहिलोत, सचिव बेरार एज्युकेशन सोसायटी पातुर यांनी शिक्षकांना संस्थेमध्ये कार्यकरत असताना ‘मनामध्ये कोणत्याही प्रकारची स्वार्थ न ठेवता सत्कार्य करत रहा तेव्हाच संस्था ही यशस्वीते कडे वाटचाल करू शकते’. ‘माणसाने खूप अपेक्षा केल्या आणि त्या पूर्ण झाल्या नाहीत तर तो दुःखी होतो’ असे प्रतिपादन श्री विजयसिंह गहलोत यांनी त्यांच्या 64 व्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमामध्ये सत्काराला प्रत्युत्तर देताना केले. एम पी उंबरकर प्राचार्य, मदर इंडिया कॉन्व्हेंट पातुर आणि आणि सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तर्फे शाल श्रीफळ आणि भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. विद्यालयामधील विद्यार्थ्यांनी सुद्धा सरांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत शुभ आशीर्वाद प्राप्त केले. ‘मोठ्या मनाचा राजा’ असे वक्तव्य एस बी पुरूषोत्तम बीएड कॉलेज पातुर चे अध्यक्ष श्री गोपालजी पुरुषोत्तम यांनी केले. वाढदिवसाचे औचित्य साधत जिल्ह्यातील सर्व मान्यवर मंडळी यांनी सरांची भेट देऊन सरांना शुभाशीर्वाद दिले. विद्यालयांमध्ये सेवानिवृत्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सुद्धा भेट देऊन सरांचा सत्कार केला. कार्यक्रमाला शहरातील मान्यवर पत्रकार मंडळी उपस्थित होते. कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती जगमोहनसिंह गहिलोत, विपिनसिंह गहिलोत होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य एस. बी. ठाकरे सर यांनी केले. संचालन प्रा. पी पी वाकोडे आभार प्रदर्शन एस एस इंगळे यांनी केले.











