उप पोलीस स्टेशन पेरमिलीचा अभिनव उपक्रम.
सौ.निलिमा बंडमवार
उपजिल्हा प्रतिनिधी गडचिरोली.
गडचिरोली : गडचिरोली जिल्हा हा मुख्यत्वे आदिवासीबहुल, अतिदुर्गम व घनदाट जंगलाने व्याप्त जिल्हा म्हणून ओळखला जातो. हा जिल्हा अतिदुर्गम,डोंगर दऱ्याने व्याप्त व अविकसित असून जिल्ह्याच्या एकूण जमिनीच्या क्षेत्रापैकी 75 टक्के भाग जंगलाने व्याप्त आहे. येथील नागरिकांचे जीवनमान वनमजुरी या रोजगारावर अवलंबून आहे. येथील बहुतेक नागरिक आर्थिकदृष्टया जागृत नसल्यामुळे त्यांना आर्थिक बचत कशी करावी हे ज्ञात नाही.येथील नागरिकांना गडचिरोली जिल्ह्यातील राष्ट्रीयकृत बँक मार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध शासकीय योजनांचा लाभ घेता यावा व आर्थिक बचत करता यावी या उद्देशाने गडचिरोली पोलीस दल व विविध राष्ट्रीय कृत बँक मार्फत शून्य बाकी या तत्वावर बचत खाते काढून देण्यात येत आहे.दि.29 मार्च रोजी उप पोलीस स्टेशन पेरमिली येथे जिल्हा पोलीस अधीक्षक अंकित गोयल,अप्पर पोलीस अधीक्षक सोमय मुंडे,अप्पर पोलीस अधीक्षक समीर शेख,अप्पर पोलीस अधीक्षक अनुज तारे,यांच्या संकल्पनेतून तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकुर,सुजीत क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली,पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातून उप पोलीस स्टेशन पेरमिलीे,महाराष्ट्र बँक पेरमिली व पोस्ट विभाग पेरमिली यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य बँक जनजागरण मेळाव्याचे आयोजन करण्यात आले.सदर मेळाव्याला प्रमुख पाहुणे म्हणुन बँक मॅनेजर अंकुल वारके महाराष्ट्र बँक पेरमिली,सुरेश कोंडागुर्ले रोखपाल महाराष्ट्र बँक पेरमिली,श्रीनिवास बंडमवार शाखा डाकपाल पेरमिली,किरण राउत शाखा डाकपाल पल्ले,अतुल गौतम शाखा डाकपाल आरेंदा,सुभाष दहागावकर,प्रज्ञदीप मानकर,सीआरपीएफ चे कमांडन्ट असीत दास,दर्शन चांदेकर हे उपस्थित होते.सर्वप्रथम महापुरुषांच्या प्रतिमेला हार अर्पण करून व दीप प्रज्वलन करून सदर जनजागरण मेळाव्याचे प्रमुख पाहुण्यांच्या हस्थे उदघाटन करण्यात आले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रभारी अधिकारी धवल देशमुख यांनी केले त्यांनी गडचिरोली पोलीस दलाचे वतीने पोलीस दादालोरा खिडकी मार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध शासकीय नागरी उपक्रम बाबत माहिती दिली तसेच जास्तीत जास्त नागरिकांनी बचत खाते काढावे याबाबत आव्हान केले.पेरमिली महाराष्ट्र शाखा व्यवस्थापक अंकुल वारके महाराष्ट्र बँक यांनी महाराष्ट्र बँकेमार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध लोक कल्याणकारी योजनांबाबत तसेच बचत खाते सर्वांना काढणे का अनिवार्य आहे याबाबत मार्गदर्शन केले.तसेच शाखा डाकपाल किरण राऊत यांनी पोस्ट विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांबाबत मार्गदर्शन केले.सदर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन पोउपनी अजय राठोड यांनी केले.सदर मेळाव्यामध्ये उपस्थित नागरिकांना विनाशुल्क बचत खाते,मोबाईल आधार अपडेट,प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना,प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा,ई श्रम कार्ड,अटल पेन्शन योजना याप्रकारे सुविधांचा लाभ मिळवून देण्यात आले.सदर शिबीर यशस्वी होण्याकरिता प्रभारी अधिकारी धवल देशमुख, पोउपनी गंगाधर जाधव, पोउपनी अजय राठोड, जिल्हा पोलिस,राज्य राखीव पोलीस दलाचे अमलदारांनी,महाराष्ट्र बँक व पोस्ट विभाग पेरमिली च्या अधिकारी व कर्मचारी यांनी संघभावनेने परिश्रम घेतले.सदर मेळाव्याला अतिदुर्गम भाग असलेल्या चौडंपल्ली,मिरकल,पल्ले,चंद्राटोला,कोरेली,अारेंदा, येरमणार,अालदांडी,वेडमपल्ली, बोडमेठा इ. अशा एकूण 28 गावातील नागरिकांची उपस्थिती होती.उपस्थित नागरिकांनी सदर मेळावा आयोजित केल्याबद्दल गडचिरोली जिल्हा पोलीस दल व उप पोलीस स्टेशन पेरमिली चे आभार मानले.