अविनाश पोहरे / ब्युरो चिफ, अकोला
पातूर – गोर बंजारा साहित्य संघ द्वारा आयोजित वाशिम येथील तिसरे अखिल भारतीय गोर बंजारा साहित्य संमेलन २८व २९ मे २०२२ रोजी वाटाणे लॉन वाशिम येथे संपन्न होणार असून सकाळी ग्रंथदिंडी चे उद्घाटन आमदार निलय नाईक यांच्या हस्ते आणि माजी सभापती जयकिसन राठोड बंजारा साहित्यिक डॉ शांतीलाल चव्हाण व माजी सभापती डॉ सुभाष राठोड आदींची प्रामुख्याने उपस्थित लाभणार आहे ध्वजारोहण मा अमरसिंगजी तीलावत माजी मंत्री यांच्या हस्ते होणार असुन यावेळी प्राचार्य ग. ह.राठोड पी बी आडे हे उपस्थित राहणार आहे.नंतर संत डॉ रामराव महाराज ग्रंथ प्रदर्शनी चे उद्घाटन बी के नाईक माजी जिल्हा अधिकारी यांच्या हस्ते होणार आहे.नंतर आत्माराम कनिराम राठोड विचार मंच उद्घाटन सोहळ्याला संमेलनाध्यक्ष डॉ.प्रकाश राठोड उद्घाटक मा मंत्री मनोहर नाईक महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मा.नानाभाऊ पटोले स्वागताध्यक्ष दिलीप जाधव डॉ गणपत राठोड माजी सभापती रामसिंग जाधव मुख्यसंयोजक राजपालसिंह राठोड आयोजक मनोहर चव्हाण उद्योजक शंकर भाऊ पवार नामा नाईक आदीची उपस्थिती लाभणार आहे संमेलनामध्ये बंजारा लोकसाहित्य आणि सांस्कृतिक एकता अश्या वेगवेगळ्या विषयावर परिसंवाद आणि नितीन सरदार यांची प्रकट मुलाखत नंतर विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे उदघाटन आमदार इंद्रनील नाईक यांच्या हस्ते होणार असून प्रसिद्ध गीतकार विनायक पवार ,यांच्याअध्यक्षतेखाली आणि सुरेश चव्हाण यांच्या बहारदार सूत्रसंचालनात कवी संमेलन संपन्न होणार आहे यामध्ये समाजातील सुप्रसिद्ध साहित्यिक राधेश्याम आडे मुंबई मा जय राठोड मानोरा एकनाथ पवार नागपूर डॉ शांतीलाल चव्हाण पातूर लखनकुमार जाधव पुणे आनंद चव्हाण मुंबई मनोहर चव्हाण लाखखिंड विकास चव्हाण चाळीसगाव अरुण पवार वरळी होमसिंग पवार नागपूर सुभाष चव्हाण रामटेक रतन आडे हिंगोली शंकर राठोड मुखेड संतोष आडे आर्णी आदी साहित्यिक कवी संमेलनामध्ये सहभागी होणार असून या दोन दिवस चालणाऱ्या तिसरे अखिल भारतीय गोर बंजारा साहित्य संमेलनाला परिसरातील जास्तीत जास्त युवकांनी सहभागी होण्याचे आवाहन गोर बंजारा साहित्य संघाचे पातूर तालुका अध्यक्ष राम जाधव यांनी केली आहे.











