विकास ठाकरे
तालुका प्रतिनिधी अकोला
अकोला : कानशिवणी ते येळवन,विझोरा,कातखेडा,येवता, मलकापूर मार्गे अकोल्याला जोडनाऱ्या रस्त्याची बिकट परिस्थिती झाली होती नेमका रस्ता आहे की नाही की फक्त खड्डेच आहेत याचा थांगपत्ता लागत नव्हता सदर रस्ता हा अजूनही बनण्याच्या प्रतीक्षेत होता मात्र उशिरा का होईना सदर रस्त्याचे खड्डे दुरुस्तीचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाने पुन्हा सुरू केले. या रस्त्याने ये जा करणाऱ्यांची खूप मोठी वर्दळ असते, कारंजा, पिंजर,मोरगांव,बोरगाव खुर्द, कानशिवणी, टाकळी, पातूर नंदापूर, देवळी,सुकळी,दोनद,राहीत,एरंडा, गोरवा,आदी दूरच्या आणि जवळच्या गांवावरून याच मार्गे येणे जाणे करतात यामध्ये अनेक सरकारी कर्मचारी, व्यावसाईक, विध्यार्थी, खाजगी नोकरी करणारे,व्यापारी या सर्वांचे अकोला ही मुख्य बाजारपेठ असल्याने येणे जाणे याच मार्गे असते परंतु रस्त्याच्या झालेल्या दुर्दशेने अनेकांच्या जीवावर बेतत होते.अनेक नागरिक मोठमोठ्या खड्ड्यांमुळे गाडी स्लिप होऊन तर कोणी एकारीच्या साईट पाटल्यांवरुन सरळ रस्त्याच्या खाली जाऊन पडत होते असे अनेक अपघात रोजच होत होते अनेकांनी आपला जीवसुद्धा गमावला होता. सर्व नागरिक रस्त्यांकरिता आपल्या संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करित होते. सभापती राजेश वावकार यांनी तीन वर्षापासून सतत पाठपुरावा केला आणि शेवटी आज दिनांक 7/3/2022 पासून हा संपूर्ण दुरुस्ती करण्यात येत आहे. कानशिवणी ते येवतापर्यंत रस्त्याचे अंतर बारा किलोमीटर असून सदर रस्ता हा पूर्ण नविन करावा किंवा किमान खराब झालेले सर्व पैचेस करण्यात यावेत अशीही मागणी सर्व परिसरातील गावचे नागरिक करित होते.शेवटी या रस्त्याच्या दुरुस्तीला सुरुवात झाल्याने सर्व स्तरातून समाधान व्यक्त होत आहे.
अनेक दिवसांपासून सदर रस्त्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत अनेकदा बातम्या प्रकाशीत केल्यात,सार्वजनिक बांधकाम, जिल्हाधिकारी,पालकमंत्री यांना निवेदने देऊन मागील दोन वर्षापासून पाठपुरावा केलाय त्याचा परिणाम म्हणुन आज दुरुस्तीला सुरवात झाली, दुरुस्ती होत असल्याने सर्व नागरिक समाधान व्यक्त करित आहेत.तरी पूर्ण रस्ता नविन व्हावा यासाठी आणखी पाठपुरावा करू. तसेच रस्त्याची दुरुस्ती थातूर मातूर न होता योग्य व्हावी याकडेही लक्ष राहील.
राजेश वाहोकार
सभापती पंचायत समिती अकोला