देवेन्द्र बिसेन
जिल्हा प्रतिनिधि गोंदिया
आज २आँक्टोबर रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहादुर शास्त्री ह्यांची जंयती व गुणवंत विद्यार्थी यांना प्रमाणपत्र देण्यात आले.
सविस्तर वृत असे की आज कारंजा इथे २ आँक्टोबर रोजी अंबिका सार्वजनिक वाचनालय कारंजा इथे जयंती साजरी करण्यात आली. ह्यावेळी गोंदिया जिल्हा परिषद चे अर्थ व बांधकाम सभापती संजय टेंभरे व प्रमुख अतिथी श्रीमती अस्मिता मंडपे,सरपंच विठ्ठलराव हरडे,उपसरपंच मीताराम हरडे,नोकचंद कापसे, पोलिस पाटिल सौ उल्का रंगारी, तंटामुक्त अध्यक्ष सुभाष मडावी, व सर्व गावकरी हजर होते. कार्यक्रमाची शुरूवात दिपप्रवज्वन करण्यात आली व सर्व पदाधिकारी यांना सालश्रीफल देऊन सत्कार करण्यात आले.तसेच १०वी मध्ये प्रथम कु आँचल शंकर टालटे,व१२वी तील आलोक वसंत रहमतकर ह्या विद्यार्थी यांना मोमेंटो व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.ह्या वेळी अंबिका सार्वजनिक वाचनालय चे अध्यक्ष श्री फनेंद्र हरिणखेडे, उपाध्यक्ष विठ्ठरराव हरडे सचिव टेकचंद बलभद्रे , सदस्य विनायक चव्हान, मारोती भिमटे, विजय वाघाडे गोपाल हजारे, राजु पेशने, सेवानिवृत्त पर्यक्षक दिनेश रहमतकर कन्हैयालाल रहमतकर सर्व मोठ्या संख्येत हजर होते.कार्यक्रमाचे संचालन विनायक चव्हान तर प्रस्तावना संस्थेचे सचिव टेकचंद बलभद्रे व आभार संस्थेचे अध्यक्ष फनेंद्र हरिणखेडे यांनी केले.