अविनाश पोहरे
ब्युरो चिफ, अकोला
नुकताच ओरिसा राज्यातील INS CHILKA येथे झालेल्या इंडियन नेव्ही अग्निविर एस.एस.आर पासिंग आऊट परेड शपथग्रहण समारोहात ड्रिल कमांडर विनय वसंतराव गाडगे याने प्रशिक्षणाची काठिण्य पातळी पार करीत पायाभूत प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केले.भव्यदिव्य परेड ग्राऊंडवर एकूण 3000 अग्निविर एस एस आर मध्ये 452 महिला अग्निवीर यांचा समावेश होता.यांच्या उपस्थितीत 64 प्लटून मधून 61 व्या प्लटून चे शिस्तबद्ध रित्या नेतृत्व करीत विनय ने अकोला जिल्ह्यातून एकमेव असे नेत्रदीपक परेडचे संचालन केले.परेड ग्राउंड वरील पथसंचलनात विनय चा गुणगौरव करतांना कठीण परिश्रम घेणारा, सर्वांशी सामंजस्याने योग्य सुसंवाद साधणारा,मनमिळावू Pefect Harmony असा केला.अशा विनय च्या दैदिप्यमान कामगिरीने पातूर चे नाव भारताच्या इतिहासात गौरविले गेले.प्रशिक्षण कालावधीत प्रत्येक क्षेत्रात नावीन्यपूर्ण कार्य करीत सिनिअर नी दिलेली जबाबदारी चोखपणे बजावली.याच गुणकर्तृत्वाने पुढील प्रोफेशनल प्रशिक्षण करिता कारवार, कर्नाटक येथे INS VIKRAMADITYA हि देशातील मानांकित साहसी लढाऊ युद्ध नौका वर महाराष्ट्रातून एकमेव ड्रिल कमांडर विनय ची निवड झाली असून सर्वत्र कौतुक व अभिनंदन होत आहे.


