अतिश वटाणे
ग्रामीण प्रतिनिधी उमरखेड
उमरखेड तालुक्यातील मौजा चातारी येथे मागील पंधरा दिवसापासून डेंगू या आजाराने थैमान घातले असून काल दि .1 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 6 वाजता एका 10 वर्षीय बालकाचे डेंगू या आजाराने मृत्यू झाल्याची वार्ता समजतात संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आदर्श संजय हामद वय 10 वर्ष असे या बालकाचे नाव असून डेंगू या आजाराने मृत्यू झाल्याने गावात एकच खळबळ उडाली आहे.आदर्श हा चातारी येथील इयत्ता पाच व्या वर्गात शिकत होता आई वडील शेतमजूर असून एकुलता एक मुलगा होता त्यामुळे संपूर्ण चातारी गावात व नातेवाईकात शोककळा पसरली आहे.
गावातील काही नागरिकांनी वारंवार तक्रारी करून वैद्यकीय सेवा पुरवण्याच्या मागण्या केल्या होत्या परंतु एकदाच फवारणी करण्यात आली असल्याचे समजले गावात मागील पंधरा दिवसाने डेंगू या आजाराने थैमान घातल्यामुळे आदर्श यांचे डेंगू या आजाराने मृत्यू झाला असल्याने प्रशासनाने त्वरित दखल घेऊन तात्काळ उपाय करावे अशी येथील नागरिकांची मागणी होत आहे.