जय हनुमान मंडळाचे योद्धा ध्वज पथक ठरले आकर्षण
पोलीस उपविभागीय अधिकारी रितू खोकर यांनी गणेशाचे व ध्वज पूजन करून केली महाआरती
वैभव गुजरकर
ग्रामिण प्रतिनिधी अकोट
अकोट :- तालुक्यातील सावरा येथील गणपती विसर्जन सर्वात शेवटी मिरवणूक
पूर्वी पासून गणेश उत्सवाकरिता पंचक्रोशीत प्रसिद्ध असलेल्या सावरा गावाची ख्याति असून गेल्या अकरा दिवसापासून विराजमान असलेल्या गणरायाला तरुणाई ने ढोल , ताशे,बँड पथक तसेच ध्वज पथकाने भावपूर्ण निरोप दिला, यामध्ये बस स्टँडवरील ऑटो युनियन गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर राऊत, यांनी शंकर-पार्वती पिंडीचा देखावा मिरवणुकीमध्ये वरणगाव येथील ढोल ताशांनी जोरदार रंगत आणली तर सुभाष गणेशोत्सव मंडळ अध्यक्ष शुभम राऊत यांनी भुसावळ येथील पथकाने जल्लोष केला तर जगदंब ग्रुपच्या छावा गणेश मंडळां ला दिव्यांग विकास मंत्रालय व माजी राज्यमंत्री बच्चुभाऊ कडू यांनी पूजन करून मंडळांला भेट दिली.गौरव सपकाळ, शेखर साबळे, वैभव सपकाळ व मंडळाच्या सदस्यांनी त्याचे स्वागत केले.भुसावळ येथील सनी बँजो ढोल ताशाच्या गजरात तरुणाईने उत्सव वाढवला आणि जय हनुमान गणेश मंडळ कृष्णा जवंजाळ यांनी गणेश मूर्ती सोबतच हनुमान जी ची भव्य मूर्ती मिरवणूक ट्रॅक्टर वर काढली तरअकोला येथील योद्धा ढोल ताशे, ध्वज पथक उपविभागीय अधिकारी रितू खोकर यांनी मिरवणूक रथाचे व ध्वजाचे पूजन केले यावेळी माजी सरपंच प्रकाश जवंजाळ व पत्रकार विठ्ठलराव गुजरकर, गौरव जवंजाळ, अर्जुन जवंजाळ, राहुल जवंजाळ यांनी उपविभागीय अधिकारी रितू खोकर व ठाणेदार संजय खंदाडे यांचे शाल श्रीफळ देऊन पुष्पगुच्छ यांनी स्वागत केले व महिला पथक यांनी जल्लोष केला या मध्ये गावातील सर्व गणेश मंडळाचे सदस्य व गावातील तरुण युवकांनी व अबाल वृद्धांनी मिरवणुकीत उत्साह पूर्ण भाग घेतला व गणरायाला गणपती बाप्पा मोरया पुढल्या वर्षी लवकर या ‘या घोषनेने गुलाल व पुष्ण ची उधळन करून भावपूर्ण न निरोप दिला चार वाजता निघालेली मिरवणूक रात्री दहा वाजता गणेश विसर्जन झाले गावाला हजारोच्या संख्येने यात्रेचे सरूप प्राप्त झाले होते गणेश विसर्जन शांततेत पार पाडण्यासाठी ग्रामस्त व तरुणानी सहकार्य केले शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस उपविभागीय अधिकारी रितू खोकर यांच्या मार्गदर्शनात ग्रामीण ठाणेदार संजय खंदाडे यांची टीमने चौख बंदोबस्त ठेवला त्यामध्ये पीएसआय विजय पंचबुद्धे, सचिन कुलट,दादाराव लिखार,सुनील झटाले,गोपाल जाधव,शैलेश जाधव तर होमगार्ड महीला ग्रामीण पोलीस स्टेशनचा ताफा होता .विसर्जन शांततेत पार पाडण्यासाठी योगेश मोरे ,सदस्य कैलास टोलमारे,वैभव गुजरकर, प्रकाश राऊत,भाऊराव धांडे, दिगंबर सपकाळ,राजू पोटकटारे,सुनील सपकाळ,महेश पायघन ,नितीन महाले, नितीन टोलमारे,अक्षय धांडे ,नरेश पुनकर गजानन राऊत पोलीस पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष प्रथमेश सपकाळ पत्रकार पवन बेलसरे ,यांनी मिरवणूक शांतेत पार पाडण्यासाठी सहभाग घेतला.


