मनोज भगत
ग्रामीण प्रतिनिधी तेल्हारा
स्थानिक सहदेवराव भोपळे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात महात्मा गांधी व लालबहाद्दूर शास्त्री जयंती समारोहाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महात्मा फुले शिक्षण संस्थेचे सहकार्यवाह स्नेहल भोपळे तर प्रमुख उपस्थितीत प्राचार्य संतोषकुमार राऊत, गणेश खानझोडे व रंजित राठोड उपस्थित होते. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी महात्मा गांधी व लालबहाद्दूर शास्त्री यांच्या जीवन कार्यावर यथोचित भाषणे दिलीत. या दिनाचे औचित्य साधून शाळेच्या परिसराची श्रमदानातून स्वच्छता करण्यात आली. यावेळी शिक्षक वृंद अभिजित भोपळे, निलेश गिऱ्हे, निखील भड, प्रशांत भोपळे, सुनील वाकोडे, गणेश भोपळे, अमोल दामधर,पद्मा टाले, प्रतिभा चोपडे, अश्विनी टाले, आरती इंगळे तसेच कर्मचारी वृंद रामकृष्ण भड, अंबादास चाफे, निलेश दांडगे आदी शिक्षक शिक्षिका व कर्मचारी वृंद उपस्थित होते. या कार्यक्रमाचे संचालन मयूर लहाने व आभारप्रदर्शन निलेश कासोटे यांनी केले.