शिवाजी शिंदे
जिल्हा प्रतिनिधी परभणी.
ठिकठिकाणी समाजबांधवांची गर्दी; प्रचंड घोषणाबाजी.
परभणी : दि.02 मराठा समाजास आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषणा पाठोपाठ जनजागृती साठी संपूर्ण मराठवाडा दौर्यावर निघालेल्या मनोज जरांगे पाटील यांचे सोमवारी दुपारी परभणीत सकल मराठा समाजबांधवांनी मोठ्या जल्लोषात स्वागत केले.पाटील यांच्या दौर्याच्या पार्श्वभूमीवर येथील सकल मराठा समाज बांधवांनी एका पाठो पाठ एक बैठकांचे सत्र अवलंबवून परिपूर्ण असे नियोजन केले. विशेषतः खेड्या पाड्यापर्यंत निरोप पाठवून मोठ्या प्रमाणावर जनजागृती केली. त्या पाठोपाठ ठिकठिकाणी मोठ मोठे होर्डीग्ज झळकाहून या सभेस समाज बांधवांनी यावे, या दृष्टीने मोठी व्युहरचना केली. श्रीकृष्ण गार्डन मंगल कार्यालयात सभा आयोजित करण्यात आली होती. परंतु, या सभेस मोठा प्रतिसाद मिळणार हे ओळखून संयोजन समितीने ऐनवेळी संत तुकाराम महाविद्यालया च्या मैदानावरच सभेचा निर्णय घेतला. पाठो पाठ त्या ठिकाणी भव्य असे व्यासपीठ उभारले. तसेच संपूर्ण मार्गावर मोठ्या प्रमाणावर भगवे झेंडे झळकवून मोठ्या प्रमाणावर वातावरण निर्मिती केली.सभेच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण जिल्ह्यातून समाज बांधव यावे या दृष्टीने व्युहरचना केल्यानंतर सभेस मोठा प्रतिसाद मिळणार हे स्पष्ट झाले होते. जरांगे पाटील हे दुपारी परभणीत दाखल झाले तेव्हा त्यांचे वसमत रस्त्यावर ठिकठिकाणी मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आले. खानापूर नाका व सभास्थळी जरांगे पाटील यांना जेसीबी मशीनद्वारे भला मोठा पुष्पहार घालून त्यांचे अभूतपूर्व असे स्वागत करण्यात आले. जय भवानी, जय शिवाजी, छत्रपती शिवाजी महाराज की या घोषणांनी संपूर्ण स्थळ दणाणून गेले होते. महाविद्यालयाच्या मैदानावरील पार्कींग स्थळ गर्दीने अक्षरशः फुलले होते.
मैदानावर सुध्दा मोठ्या संख्येने युवक सहभागी झाले होते. त्यामुळे या सभेतील जल्लोष वाखाणण्याजोगा होता.