ढोल ताशाच्या गजरात बाप्पाला निरोप
मनोज भगत
ग्रामीण प्रतिनिधी तेल्हारा
हिवरखेड येथील दोन दिवशीय श्री गणेश विसर्जन मिरवणुकीत १४ मंडळांनी सहभाग घेतला हिवरखेड नगरीतील विविध भागातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ सहभागी झाले होते. आपल्या लाडक्या गणपतीला निरोप देण्यासाठी हिवरखेड गावातील नव्हे तर परिसरातील नागरिकांनी हजेरी लावली होती श्रीगणेश मंडळाच्या पदाधिकारी यांच्या सत्काराचे आयोजन प्रेस क्लब एकता संदेश गणेशोत्सव मंडळ लोकजागर मंच एमसीएन केबल नेटवर्क व विविध संघटनाच्या वतीने करण्यात आले होते. यात उत्सवात सर्वधर्मीय नागरिक जातीय सलोखा प्रस्थापित करून शांततेत उत्सवात सहभागी झाले होते. अकोट उप विभागीय पोलीस अधिकारी रितू खोकर यांच्या मार्गदर्शनात हिवरखेड पोलीस स्टेशनचे ठाणेदार गोविंदा पांडव यांनी आपल्या पोलीस कर्मचाऱ्यांसह विसर्जन शांततेत पार पडण्यासाठी चोख बंदोबस्त ठेवला. एमसीएन केबल नेटवर्कच्या सहकार्यतून सिटी जंक्शनचे व्यवस्थापक विक्रम शर्मा यांनी विसर्जनाचे अकोला जिल्ह्यात थेट प्रेक्षपण केले होते. अत्यंत सुनियोजित श्रीगणेश विसर्जन मिरवणूक शांततेने पार पडल्यासाठी पोलीस प्रशासन विभागाला सहकार्य लाभले असे मनोगत ठाणेदार पांडव यांनी त्याच्या सत्कार समारोह कार्यक्रमाप्रसंगी व्यक्त केले या सत्कार समारोहाचे आयोजन ऑल जर्नालिस्ट अँड फ्रेंड सर्कल अकोला जिल्हा अध्यक्ष किरण सेदानी जिल्हा उपाध्यक्ष मनीष भुडके जमीर शेख यांच्या पुढाकाराने करण्यात आले होते. यात विसर्जन मिरवणुकीच्या समारोपीय कार्यक्रमात शांतता समिती व पोलीस प्रशासनाने शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी परिश्रम घेतल्याबद्दल पत्रकार बांधवांच्या वतीने हिवरखेड पोलीस स्टेशनचे ठाणेदार गोविंदा पांडव एपीआय श्रीराम जाधव व शांतता समितीचे तथा जि.प.माजी उपाध्यक्ष जमीरभाई सामाजिक कार्यकर्ते प्रकाश खोब्रागडे प्रेस क्लबचे संस्थापक श्यामशील भोपळे उपसरपंच रमेश दुतोंडे पोलीस पाटील प्रकाश गावंडे गणेश वानखडे माजी सरपंच संदीप इंगळे पुरुषोत्तम गावंडे शफाकत भाई आदी सदस्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी पत्रकार गोवर्धन गावंडे बाळकृष्ण नेरकर राजेश अस्वार बलराज गावंडे मोहन सोनोने शहजाद खान मनोज भगत राजेश पांडव राहुल गिऱ्हे फारुक सौदागर सागर खारोडे शाकीबभाई, शांताराम कवळकार, राजुखान वसीम मिर्झा रज्जाक भाई आदी पत्रकार व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्तविक व संचालन प्रा.संतोषकुमार राऊत यांनी केले.