शेख इरफान
जिल्हा प्रतिनिधी यवतमाळ
उमरखेड मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी येथील तहसील कार्यालयाच्या 7 प्रांगणात दि 2 ऑक्टोंबर पासून येथील मराठा बांधवांनी बेमुदत साखळी उपोषण सुरु केले आहे या उपोषण मंडपी तालुक्यातील जेवली पिंपळगाव, परोटी, बंदीभागातील समाज बांधव उपस्थित होते यावेळी हदगाव येथील मराठा बांधव दता पाटील हडसणीकर यांनी भेट दिली असून आरक्षण संबंधित प्रमुख मागण्या सरसगट मराठा समाजाला कुणबी प्रमाण पत्र देण्यात यावे व संसदेत आरक्षण मर्यादा वाढवून मराठा समाजाला वेगळी आरक्षणाची तरतूद करावी तसेच कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या प्रक्रीयेत विदर्भातील उमरखेड – पुसद महागाव – तालुक्याचा समावेश करावा आणि
मराठा अंदोलकावर झालेले गुन्हे सरसगट मागे घेण्यात यावे आंतरवाली सराटी येथे झालेल्या अमानुषपणे लाठी हल्यात चौकशी करून दोषीवर कार्यवाही यावी या मागणीसह साखळी उपोषणाला भेट देऊन आपल्या मागण्या जाहीर केल्या. दि २ ऑक्टोबर पासुन सुरू झालेल्या बेमुदत साखळी उपोषणात सुदर्शन जाधव लक्ष्मीकांत देवसरकर संभाजी जाधव, राम सोळंके, संकेत देवसरकर, गजु पाटील कोल्हे, बाळू शिंदे, मारोती नरवाडे, अशोक जाधव, राजू पाटील देवसरकर उपसरपंच सचिन देवसरकर
पंडीत इंगोले, प्रवीण जाधव, दिलीप महाडीक, महेश देवसरकर, प्रथमेश जाधव, अमोल जाधव माटाळकर माटाळकर, प्रभाकर अनुप जाधव, निरंजन सुनील देवसरकर दादाराव मुळे, राजू देवसरकर, विकास नरवाडे आदी गावकरी बेमुदत साखळी उपोषणात सहभागी झाले उपोषण मंडपी आपले मत व्यक्त करताना दत्ता पाटील हडसणीकर यांनी दिनांक 14 ऑक्टोबर रोजी अंतरावली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांच्या सभेला मराठा बांधवांनी उपस्थित राहावे असे आवाहन केले आहे.