शिवाजी शिंदे
जिल्हा प्रतिनिधी परभणी.
मनोज जरांगे पाटील यांचा विश्वास. परभणीत जंगी सभा
परभणी : दि.02 मराठा समाजाच्या आरक्षणाचा निर्णय निश्चितच निर्णयाच्या टप्प्यापर्यंत पोहोचला आहे. त्यामुळेच मराठा समाजबांधवांनी न्याय हक्काचे ते आरक्षण पदरात पडेपर्यंत आपल्या शक्तीसह ऐक्य कायम राखावे, असे आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी सोमवारी (दि.02) परभणीत आयोजित केलेल्या जंगी जाहीर सभेतून केले.वसमत रस्त्यावरील संत तुकाराम महाविद्यालया च्या मैदानावर सकल मराठा समाजाने आयोजित केलेल्या प्रचंड जाहीर सभे प्रसंगी ते बोलत होते. यावेळी जरांगे पाटील यांनी, मराठवाड्यातील मराठ्यांना कुणबी जात प्रमाणपत्र मिळावे आणि सरसकट मराठ्यांना आरक्षण मिळावे या मागणी करता आपण बेमुदत उपोषण केले. बरेच दिवस उपोषण केल्यानंतर मुख्यमंत्र्यां च्या हस्ते हे उपोषण सोडले. परंतु, त्यावेळी आपण सरकारला अल्टिमेटम दिला. एक महिन्याच्या अवधीत मराठ्यांच्या आरक्षणा सह अन्य मागण्या मान्य न झाल्यास यापेक्षा उग्र आंदोलन छेडले जाईल, असेही स्पष्ट केले होते. दरम्यान, हा अल्टिमेटम चा कालावधी 14 ऑक्टोंबर रोजी संपणार आहे. त्यानंतरसुध्दा आपण दहा दिवसांची वाढीव मुदत सरकारला बहाल केली आहे, असे नमूद करीत पाटील यांनी या अंतीम मुदतीत मराठा आरक्षणाचा प्रश्न निश्तिच मार्गी लागेल, अशी अपेक्षा व्यक्त केली.निर्णय होई पर्यंत समाज बांधवांनी आता निर्णायक लढाईकरीता कंबर कसली पाहिजे. सदैव जागरुक राहुन लढ्यातून पूर्णपणे यशच पदरात पाडून घेतले पाहिजे, असे आवाहन ही केले. मराठवाड्यातील विविध जिल्ह्यांमध्ये जाऊन जाहीर सभा घेत आहेत. तसंच, आपल्या मराठा आरक्षणाची धार मजबूत करत आहेत. मराठा समाजाचा पाठिंबा वाढत आहे. नव्या पिढीसह तमाम समाज आज एक जूटीने उभा राहतो आहे. त्यामुळेच हे सकारात्मक चित्र टिकवावे लागेल, निर्णायक टप्प्यापर्यंत आलेले हे आंदोलन आता उग्र होणार नाही, आत्महत्ये सारखे प्रकार घडणार नाहीत. जाळपोळीसारख्या हिंसक घटना होणार नाहीत याची काळजी घेवून निर्णायक टप्प्यात आता कोणीही कोणत्याही आमिषांना बळी पडता कामा नये. गटातटाचा विषयसुध्दा आणता कामा नये, असे स्पष्ट करतेवेळी जरांगे पाटील यांनी समाज बांधवांनी आता जनजागृतीवरच पूर्णतः लक्ष केंद्रीत करावेत, आपल्या ताकदीवरच, शक्तीवरच हे आरक्षण मिळणार आहे, त्यामुळे दक्ष रहावे, असे ते म्हणाले. मराठा समाजास सरसकट कुणबी प्रमाणपत्र मिळाले पाहिजेत, व्यवसायानुरुप आरक्षण या तत्वाच्या आधारावरच मराठा समाजाचा शेतीचा व्यवसाय ओळखून कुणबी प्रमाणपत्र मिळाले पाहिजे, 50 टक्क्यांच्या आतच हे आरक्षण दिले पाहिजे, यासाठी आपण आग्रही आहोत, या निर्णाय लढाईत आता कोणत्याही प्रकारची लवचिकता असणार नाही, माघार होणार नाही, या दृष्टीने समाजबांधवांनी जागरुक रहावे, असे आवाहनही जरांगे पाटील यांनी केले.सरकारला एक महिन्याची मुदत दिली. 14 ऑक्टोंबर रोजी मुदत संपत आहे. पुढील दहा दिवस वाढीव वेळ म्हणून मुदत दिली आहे. त्यामुळे आता 24 ऑक्टोंबर पर्यंत निर्णायक आदेशाची प्रतिक्षा करु, आंतरवालीत 24 ऑक्टोंबर रोजी सर्व समाज बांधव संपूर्ण राज्यातून दाखल होणार आहेत. त्याच दिवशी आंतरवालीत पुढचा निर्णय घेवू, असा इशारासुध्दा जरांगे पाटील यांनी दिला. दरम्यान, या सभेस जरांगे पाटील यांनी 17 दिवसाच्या त्या आंदोलन काळातील मंत्री महोदयांपासून ते मुख्यमंत्री तसेच अन्य नेतेमंडळींच्या गाठी भेटी, मतमतांतरे, वगैरे गोष्टींचे काही किस्सेही सांगितले.दरम्यान, या सभेस मोठ्या संख्येने समाजबांधव उपस्थित होता.