अतिश वटाणे
ग्रामीण प्रतिनिधी उमरखेड
उमरखेड तालुक्यातील बाळदी या गावात प्रत्येक गल्लीमध्ये एक देवी बसली जाते व ती परंपरा आजही कायम आहे. आणि आज मोठ्या उत्साहात शारदा देवी व दुर्गा देवी यांचे आगमन झाले असून पहिल्याच दिवशी सहारा सार्वजनिक शारदा महिला मंडळ या ठिकाणी भजनाचा कार्यक्रम घेऊन आनंदाचे वातावरण निर्माण झाले. गावातील प्रसिद्ध असलेले भजनी मंडळ आपल्या कार्यक्रमातून सतत समाज प्रबोधनाचे काम नेहमी करत असते. सहारा सार्वजनिक शारदा महिला मंडळ हे गेल्या खूप दिवसापासून नावाजलेले मंडळ असून या ठिकाणी रोज प्रत्येक जाती-धर्मातील लोक महिला, पुरुष, बालगोपाल सर्वजण आरतीच्या वेळी एकत्र एकच येतात तसेच या दहा दिवसांमध्ये वेगवेगळी समाज प्रबोधन कार्यक्रम, खेळांच्या स्पर्धा असे इतर उपक्रम घेऊनआपले आनंदाचे दहा दिवस पार पाडतात.


