दिनेश आंबेकर
तालुका प्रतिनिधी जव्हार
जव्हार : गो. ए. सो. चे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय ग्रामीण विकास विभागांतर्गत रानभाज्या महोत्सव आयोजित करण्यात आला होता. सदरील कार्यक्रमाचे उद्घाटन प्रमुख पाहुणे माजी विद्यार्थी मंडळ सदस्य मोईन मनियार सामाजिक कार्यकर्ते यांच्या हस्ते होऊन या महत्त्वाच्या महोत्सवाला अध्यक्षस्थानी डॉ. हेमंतजी मुकणे उपप्राचार्य यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच ग्रामीण विकास विभाग अंतर्गत घेण्यात आलेल्या रानभाजी महोत्सवाचे परीक्षण करण्याकरिता भारती विद्यापीठ जव्हार येथील उपप्राचार्य लता नायकर व सह्याद्री संशोधन संस्था संस्थापक अध्यक्ष डॉ. भावनाताई घोलप निसर्गोपचार तज्ञ, ठाणे बँक जव्हारचे मॅनेजर मा. उल्हासजी सांगळे, प्रा. अनंता आवळे ग्रामीण विकास विभाग प्रमुख प्रा. डॉ. कांतीलाल पाटील इत्यादी मान्यवर उपस्थित होते. या अत्यंत महत्त्वपूर्ण महोत्सवातमहाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी एकूण २४ रानभाज्यांचे स्टॉल अत्यंत मेहनतीने आकर्षक पद्धतीने मांडले होते.सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनींचा प्रचंड उत्साह व आनंद या महोत्सवात होता. यामुळे परिसरातील रानभाज्यांची माहिती अधिक शास्त्रीय पद्धतीने झाली. आलेल्या परीक्षकांनी व प्रमुख पाहुण्यांनी महाविद्यालयाने आयोजित करण्यात आलेल्या या विशेष रामभाजी महोत्सवाचे कौतुक करून, आपला अमूल्य वेळ देऊन,विद्यार्थ्यांना रानभाज्यांबद्दल महत्व पटवून देऊन या रानभाज्यांची व्यवसायासंदर्भात जोड लावता येईल याबद्दल मार्गदर्शन केले. या रानभाजी महोत्सवाला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम.आर. मेश्राम यांनी विशेष प्रोत्साहन, मार्गदर्शन व शुभेच्छा दिल्या. यावेळी महाविद्यालयातील विभाग प्रमुख,प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी रानभाज्या चा आस्वाद घेतला.