शिवाजी शिंदे
जिल्हा प्रतिनिधी परभणी.
सेलू : दि. 14 ऑक्टो.रोजी माजलगाव गेवराई महामार्गावर मोटार सायकलचा अपघात होउन रामभाऊ ज्ञानोबा बागल वय ५२ दत्तनगर सेलु हे जागीच ठार झाले.
ही घटना शनिवार रोजी सांय ०५ वाजता घडली
रामभाऊ बागल व अंतेश्वर मुकने हे दोघे जण शनिवार रोजी सायंकाळी मोटारसायकलवरुन परत येत असताना गेवराई माजलगाव मार्गावर लोणावळा फाट्याजवळ मोटारसायकला कुत्रा अडवा आल्याने मोटारसायकल घसरुन मागे बसलेले रामभाऊ बागल हे रस्तावर आदळल्याने जागीच ठार झाले. मोटार सायकल चालक अनंतेश्वर मुकने हे कीरकोळ जखमी झाले असून त्यांच्यावर ऊपचार चालू आहे
माजलगाव रुग्णालयात वैधकिय तपासनी व शवविच्छैदन झाल्यानंतर सेलु येथे वैकुंठधाम रविवार रोजी राजमोहला भागातील स्मशान भुमीत अंत्यसंस्कार सकाळी १० वा करण्यात आले.
यावेळी सेलुतील पत्रकार, सर्व राजकीय पदाधिकारी, कर्मचारी, समाज सेवक यांच्या सह दत्तनगर मधील सर्व रहीवासी, नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
रामभाऊ बागल हे सेलु येथे टेलरिंग व्यवसाय करीत होते. त्यांच्या पश्चात आई ,वडील, दोन मुली ,जावई,एक मुलगा, सुन नातवंडे असा मोठा परिवार आहे. सेलु पत्रकार संघाचे अध्यक्ष लक्ष्मण बागल यांचे ते मोठे बंधु होते.