शिवाजी शिंदे
जिल्हा प्रतिनिधी परभणी
सेलू : दि. 14 ऑक्टो. रोजी अंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षण प्रश्नां संबधी मराठ्यांचा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी पुकारलेल्या विराट जाहीर महासभेला महाराष्ट्रा तील तमाम मराठ्यांनी भरभरून प्रतिसाद दिला आणि महासभा यशस्वी केली,हि महासभा यशस्वी करण्यामागे महाराष्ट्रा तील अनेकांनी खारीचा वाटा उचलला. यामध्ये सेलू येथे सभेला जाणाऱ्या सर्व मराठा बांधवासाठी माजी नगराध्यक्ष विनोदरावजी बोराडे व मित्र मंडळ यांच्या वतीने छ.संभाजी महाराज चौक, रायगड कॉर्नर सातोना रोड सेलू येथे अन्नछत्र उभारून मराठा बांधवाची सेवा केली,अन्नछत्र पहाटे 3 ते 9 दरम्यान सुरू होते,अन्नछत्र चालु केले होते.यात 8 हजार नाष्टाची पाकिटे तयार करून सोबत पाणी बोटालचे वाटप करण्यात आले. रात्री 2 : 30 वाजल्यापासून विनोद बोराडे,साईराज बोराडे व मित्र मंडळाचे सर्व पदाधिकारी यांनी पहिल्या गाडीचे वाहन चालक यांचा शाल, हार घालून फटाक्यां च्या आतषबाजीने बँड च्या गजरात स्वागत करून प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या,यानंतर येणाऱ्या प्रत्येक गाडीचे स्वागत बँड च्या गजरात वाजत गाजत स्वागत केले. नंतर नाश्ता व पाणी बॉटल देण्यात येत होते. यासाठी सर्व पदाधिकारांनी परिश्रम केले.