गोकुळ हिंगणकर
तालुका प्रतिनिधी तेल्हारा
तेल्हारा : मातोश्री नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित तेल्हाराची २३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा संस्थेचे मुख्य कार्यालय जनसंपर्पण नगरपरिषद वाचनालय रोड तेल्हारा येथे संपन्न झाली येथे संस्था अध्यक्ष कमल मदनलाल माहेश्वरी यांच्या अध्यक्षतेखाली व कार्यकारी मंडळाच्या उपस्थितीत २८ ऑगस्ट रोजी संपन्न झाली. संस्थेचे व्यवस्थापक नटवर गोपीकिशन जोशी यांनी प्रास्ताविक केले एक लाख सत्याएशी हजार दोनशे रुपये भाग भांडवलावर व पंधरा लाख रुपयांच्या ठेवीवर सन २००० मध्ये आरंभ झालेल्या मातोश्री नागरी पतसंस्थेजवळ 58 लाख रुपये भाग भांडवल व .21 कोटींवर ठेवी व स्वमालकी ची इमारत असल्याचे व अंकेक्षण वर्ग अ आहे .संस्थेचे सचिव रवी निरंजन पाडीया यांनी सांगितले.
मंचावर संस्थेचे अध्यक्ष कमल मदनलाल माहेश्वरी उपाध्यक्ष रतनलाल गोविंदरामजी तिवर. सचिव रवी निरंजन पाडीया . संचालक डॉ.बाबुराव नामदेव शेळके, भिकाजी नामदेव वाकोडे.आदींची उपस्थिती होती. संचालन व्यवस्थापक नटवर गोपीकिशन जोशी यांनी केले. यावेळी संस्थेचे कर्मचारी ज्ञानेश्वर दातकर, मिलिंद तांबोळकार , प्रविण पालीवाल, अमोल अढाऊ, परीक्षीत राजनकर.नितिन जिंदे, चेतन चोपडे, रजत अग्रवाल, आनंद मंत्री, सुनिल सत्रावळे, धिरज फापट, मयंक जिंदे, राजेश मिरगे,शंतुनु कंरागळे, पवन ठाकुर, वैभव महाले व अल्प बचत संग्राहक उपस्थित होते. यावेळी आभार प्रदर्शन गोकुळ हिंगणकर यांनी केले.