महेश निमसटकर
तालुका प्रतिनिधि भद्रावती
भद्रावती : विश्व हिंदू परिषदेतर्फे आयोजित विदर्भ प्रांताच्या मातृशक्ती अभ्यासवर्गाचे उद्घाटन शुक्रवारी येथील जैन मंदिराच्या सभागृहात थाटात संपन्न झाले.चिन्मय मिशन चंद्रपूरच्या केंद्र प्रमुख स्वामिनी हरिप्रियानंद सरस्वती यांच्या हस्ते भारत माता, प्रभू श्रीराम आणि भगवान पार्श्वनाथ यांच्या प्रतिमांना पुष्पमाला अर्पण करून आणि दीप प्रज्वलन करून उद्घाटन करण्यात आले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून विहिंपचे विदर्भ प्रांत मंत्री गोविंद शेंडे, केंद्रीय मातृशक्ती संयोजिका मीनाक्षी पिशवे(भोपाळ), विदर्भ प्रांत संयोजिका कांचन ठाकरे (भंडारा), विदर्भ प्रांत धर्माचार्य संपर्क प्रमुख प्रा. सुरेश परसावार, विहिंपचे जिल्हा अध्यक्ष रोडमल गहलोत आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते. याप्रसंगी स्वामिनी हरिप्रियानंद सरस्वती यांनी शुभाशीर्वादपर मार्गदर्शन केले. तसेच गोविंद शेंडे यांचे प्रमुख भाषण झाले. यावेळी अर्चना परसावार यांनी वयक्तिक गीत सादर केले. सदर अभ्यासवर्ग दि.२९, ३०, व ३१ जुलै असे तीन दिवस चालणार आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कांचन ठाकरे यांनी केले. संचालन अंजू घोलवे यांनी केले. या संपूर्ण अभ्यासवर्गाची व्यवस्था उल्हास भास्करवार हे सांभाळत आहेत.