शेख इरफान
जिल्हा प्रतिनिधी यवतमाळ
यवतमाळ : स्वातंत्र्याच्या 76 वर्षानंतरही विकासापासून कोसो दूर असलेले नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यापासून अगदी 3 किलोमीटर अंतरावर असूनही विकासापासून वंचित असं छोटेशे गट ग्रामपंचायत असलेले गाव म्हणजे “भानेगाव तांडा”, बंजारा बहुल खेडेगाव या गावात एस टी बस कधीच आली नाही, शिक्षण फक्त 4 थी पर्यंतच,गावातील मुले व मुली 4थी पर्यंत आनंदाने शिकतात,परंतु खराब रस्त्यामुळे पुढील शिक्षणासाठी, सायकल, मोटरसायकल किंवा ऑटोने तालुक्याच्या ठिकाणी योग्यरीत्या जाऊच शकत नाही, बिमार व्यक्ती तर वेळेवर दवाखान्यात न पोहोचल्याने वाटेतच दम तोडतात,गरोदरमातांची प्रसूती अनेकवेळा रस्त्यातच झाली आहे,काही स्त्रीया तर दगवल्या सुद्धा नेते मंडळी फक्त मते मागण्यासाठी येतात आणि एकदा निवडून आले की परत 5 वर्षे गावाचे तोंडचं पाहत नाही, स्वातंत्र्याच्या 76 वर्षात या तांड्याचे माजी उपसरपंच आणि समाजसेवक श्री बाबुराव चव्हाण यांच्या नैतृत्वात फक्त एकदाच गावकऱ्यांनी रास्ता रोको केला होता म्हणून तात्पुरता डांबरी रस्ता बनविण्यात आला होता,काँट्रॅक्टरने निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरल्याने त्यावेळी बनविलेला रोड 2 वर्षातच भूमिगत झाला उपरोक्त बाबीकडे स्थानिक खासदार,आमदार,विरोधी पक्षातील नेतेमंडळी, सामाजिक बांधकाम विभाग,जिल्हापरिषद .
पंचायत समिती,सार्वजनिक बांधकाम विभाग आणि ग्रामपंचायतीने गंभीरपणे लक्ष देणे गरजेचे आहे आणि खराब रस्त्यामुळे नाहक बळी पडणाऱ्या लोकांचे प्राण वाचविले पाहिजे करीता माजी उपसरपंच श्री बाबुराव चव्हाण यांनी ग्रामस्थांसोबत प्रत्यक्ष स्थानिक आमदार श्री माधवराव जवळगावकर यांची भेट घेऊन निवेदन दिले आणि सांगितले की, मागील अनेक वर्षांपासून आपणास वारंवार निवेदन देऊनही अद्यापही दखल घेतली नाही कृपया शक्य तितक्या लवकर रोडचे काम पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करावे असे निवेदनाच्या माध्यमातून पाठपुरावा केला, आमदारांनी ग्रामस्थांना अश्वाशीत केले की रोडच्या बांधकामाकरीता निधी मंजूर झाला असून लवकरच कॉन्ट्रॅक्टरला रोडचे काम सुरू करायला लावतो असे सांगितले.


